TRENDING:

Virosh Wedding : मराठमोळा दिग्दर्शक पोहोचला विरोशच्या रिसेप्शनला, रश्मिका-विजयसोबत काय कनेक्शन?

Last Updated:

Marathi Director Atted Virosh Wedding Reception in Hyderabad : मराठी दिग्दर्शक आणि साऊथ सुपरस्टार्स यांचं कनेक्शन काय? असा प्रश्न अनेकांना पडला. पण यामागचं कारण अखेर समोर आलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साऊथ अभिनेत्री, नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी नुकतंच उदयपूरमध्ये लग्न केलं. दोघांचं लग्न फार मोजक्या लोकांमध्ये करण्यात आलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. उदयपूरमधील लग्नानंतर दोघांनी हैद्राबादमध्ये ग्रँड रिसेप्शनचं आयोजन केलं होतं.  या रिसेप्शनला साऊथसह बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली. मात्र या सोहळ्यात एक मराठमोळं नाव पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या.
News18
News18
advertisement

प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने विरोशच्या रिसेप्शनला हजेरी लावली होती. आदित्य सरपोतदार विरोशच्या रिसेप्शनला उपस्थित असल्याचं पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली. मराठी दिग्दर्शक आणि साऊथ सुपरस्टार्स यांचं कनेक्शन काय? असा प्रश्न अनेकांना पडला. पण यामागचं कारण अगदी स्पष्ट आहे.

( अखेर रश्मिका विजयची झाली! 'विरोश'च्या शाही रिसेप्शनचा थाटच न्यारा; पाहा साऊथच्या पॉवर कपलचा रॉयल लूक )

advertisement

आदित्य सरपोतदार आणि रश्मिका मंदाना यांनी आगामी हॉरर-कॉमेडी थामा या सिनेमात एकत्र काम केलं होतं. सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या सिनेमात रश्मिकाने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमात आयुष्मान खुराना देखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. हा सिनेमा मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा भाग आहे.

रश्मिकासोबत काम करण्याचा अनुभव सांगताना आदित्य सरपोतदारने तिच्या मेहनतीचं आणि डेडिकेशनचं खूप कौतुक केलं होतं. तो म्हणाला होता, रश्मिका अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रोफेशनल अभिनेत्री आहे. सलग 12 तासांच्या शूटिंगदरम्यानही ती थकली आहे अशी कोणतीही तक्रार करत नाही. कोणताही सीन असो ती पूर्ण तयारीनिशी सेटवर येते आणि शांतपणे आपलं काम पूर्ण करते.

advertisement

रिसेप्शननंतर आदित्य सरपोतदारने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत विरोशलाला शुभेच्छा दिल्या. आदित्यने पोस्टमध्ये लिहिलंय, रश्मिका आणि विजय तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही दोघे एकत्र खूप सुंदर दिसता. आयुष्यातील प्रत्येक गोंधळाच्या क्षणी एकमेकांसाठी शांततेचा आधार बना आणि कायम एकमेकांचे सर्वात मोठे पाठीराखे राहा… तुम्हा दोघांनाही खूप सारं प्रेम आणि आशीर्वाद".

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; 30 रुपयांपासून खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
सर्व पहा

आदित्य सरपोतदारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास त्याने मराठीत, उलाढाल, सतरंगी रे, नारबाची वाडी, क्लासमेट, फास्टर फेणे, झोंबिवली सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. तर हिंदीत मुंज्या, काकुडा, थामा सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Virosh Wedding : मराठमोळा दिग्दर्शक पोहोचला विरोशच्या रिसेप्शनला, रश्मिका-विजयसोबत काय कनेक्शन?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल