अखेर रश्मिका विजयची झाली! 'विरोश'च्या शाही रिसेप्शनचा थाटच न्यारा; पाहा साऊथच्या पॉवर कपलचा रॉयल लूक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika-Vijay wedding reception: गेल्या आठवड्यात उदयपूरमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधल्यानंतर, आज ४ मार्च रोजी हैदराबादमधील आलिशान ताज कृष्णा हॉटेलमध्ये या जोडीचा शाही रिसेप्शन पार पडत आहे.
हैदराबाद : ज्या क्षणाची प्रतीक्षा केवळ दक्षिण भारतच नाही, तर अवघ्या जगातील चित्रपटप्रेमी करत होते, तो सुवर्णक्षण अखेर अनुभवायला मिळतोय. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आणि राऊडी स्टार विजय देवरकोंडा आता अधिकृतपणे मिस्टर अँड मिसेस देवरकोंडा झाले आहेत. गेल्या आठवड्यात उदयपूरच्या निवांत वातावरणात मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधल्यानंतर, आज ४ मार्च रोजी हैदराबादमधील आलिशान ताज कृष्णा हॉटेलमध्ये या जोडीचा शाही रिसेप्शन पार पडत आहे.
बंजारा हिल्समध्ये विरोशचा जलवा
हैदराबादमध्ये लोकप्रिय असलेल्या बंजारा हिल्स परिसरात आज फक्त आणि फक्त 'विरोश' नावाचाच गजर ऐकू येतोय. चाहत्यांनी आपल्या लाडक्या जोडीला दिलेलं हे नाव आज खऱ्या अर्थाने सार्थ ठरलं आहे. 'ताज कृष्णा' या ऐतिहासिक वास्तूत आयोजित केलेल्या या रिसेप्शनला सिनेसृष्टीतील दिग्गज, राजकीय नेते आणि मोजकेच निमंत्रित उपस्थित आहेत. चाहत्यांची अलोट गर्दी लक्षात घेता, हॉटेल परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून केवळ 'इन्व्हिटेशन ओन्ली' एन्ट्री ठेवण्यात आली आहे.
advertisement
advertisement
लाल साडीत रश्मिकाचा ब्रायडल स्वॅग
रिसेप्शनमध्ये रश्मिकाचा लूक पाहून सर्वांच्याच नजरा खिळून राहिल्या. तिने परिधान केलेली गडद लाल रंगाची भरजरी सिल्क साडी आणि त्याला असलेली काळी-सोनेरी किनार तिच्या सौंदर्यात भर घालत होती. गळ्यात जड टेंपल ज्वेलरी, कानातले झुमके आणि चेहऱ्यावरील तेज यामुळे रश्मिका एखाद्या राणीसारखी भासत होती. तर दुसरीकडे, आपला राऊडी अंदाज बाजूला ठेवून विजयने पांढऱ्या रंगाचा क्लासी पारंपारिक पोषाख निवडला होता. गळ्यात ऑक्सडाइझ्ड चैन आणि दाढी-मिश्यांच्या स्वॅगमध्ये विजय अगदी रुबाबदार दिसत होता. यावेळी पॅप्सना अभिवादन करताना विजय म्हणतो, "आशा आहे की आज सगळे सेलिब्रेशन्स संपतील आणि आम्ही शांतपणे अंडरग्राऊंड होऊ."
advertisement
advertisement
"आयुष्याची नवी इनिंग..." रश्मिका झाली भावूक
मीडियाशी बोलताना रश्मिकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि थोडी धाकधूक स्पष्ट जाणवत होती. ती म्हणाली, "आम्ही दोघांनी मिळून आमच्या आयुष्यातील हे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. हा एक नवीन प्रवास आहे आणि या प्रवासासाठी आम्हाला तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद हवे आहेत." गेल्या ८ वर्षांपासून एकमेकांना डेट करत असलेल्या या जोडीने लग्नाच्या अवघ्या दोन दिवसांआधीच साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली होती.
advertisement
फॅमिली फोटो आणि सेलिब्रिटींची मांदियाळी
रिसेप्शन दरम्यान विजय आणि रश्मिकाने आपल्या कुटुंबीयांसोबत खास फोटोसेशन केलं. मंचावर दोन्ही कुटुंबांमधील जिव्हाळा पाहून उपस्थितांमध्येही आनंद पसरला होता. उदयपूरच्या इन्टिमेट लग्नानंतर हैदराबादमधील हे रिसेप्शन म्हणजे साऊथ इंडस्ट्रीसाठी एक मोठी पर्वणीच ठरली आहे. अल्लू अर्जुन, महेश बाबू आणि सामंथा रुथ प्रभू यांसारखे स्टार्स या सोहळ्याला हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 7:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अखेर रश्मिका विजयची झाली! 'विरोश'च्या शाही रिसेप्शनचा थाटच न्यारा; पाहा साऊथच्या पॉवर कपलचा रॉयल लूक








