TRENDING:

पोलीस नाही खूनीये मी..! एन्काऊंटर स्पेशलिस्टचा सायकोलॉजिकल ड्रामा, 'मॅजिक'चा थरारक खेळ या दिवशी भेटीला  

Last Updated:

अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री जुई भागवत यांचा थरारक सायकोलॉजिकल ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फक्त ओटीटी विश्वात नाही तर मोठ्या पडद्यावरही क्राइम, थ्रीलर, हॉरर तसंच सायकोलॉजिकल ड्रामा असलेले सिनेमे पाहण्यास प्रेक्षक पसंती देतात. मराठी सिनेमाही यात मागे नाही. गेल्या काही वर्षात अशा आशयाने अनेक सिनेमे येऊन गेलेत. 2026 वर्षाची सुरुवात देखील अशाच एक दमदार सायकोलॉजिकल ड्रामाने होणार आहे. अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री जुई भागवत यांचा थरारक सायकोलॉजिकल ड्रामा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
News18
News18
advertisement

'मॅजिक' असं या सिनेमाचं नाव आहे. एका एन्काऊंटरचं गूढ, अत्तराच्या सुवासाचं 'मॅजिक' काय? या प्रश्नात गुंतवून ठेवणारा ट्रेलर आहे.  अभिनेता जितेंद्र जोशी या सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत आहे. तो एक एन्काऊंटर स्पेशलिस्ट दाखवण्यात आला आहे. सिद्धीरुपा करमरकर, जुई भागवत, प्रियांका पालकर, मयूर खांडगे, अभिजित झुंजारराव, रुपा मांगले, नितीन भजन, गुरुराज कुलकर्णी, योगेश केळकर, प्रदीप डोईफोडे, रसिकराज यांच्याही सिनेमा प्रमुख भूमिका आहेत.

advertisement

( OTT Releases This Week : 2025 चा शेवटचा आठवडा, ओटीटीवर रिलीज झाल्यात या 9 नव्या फिल्म आणि सीरिज )

मॅजिकचा 2 मिनिटं 9 सेकंदाचा ट्रेलर शेवटपर्यंत खिळवून ठेवतोय. एन्काऊंटर स्पेशलिस्ट असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने केलेला एन्काउंटर आयुष्यात घडणाऱ्या उलथापालथींची गोष्ट 'मॅजिक' या सिनेमात पाहायला मिळणार आहे.  एन्काऊंटर केल्यानंतर हा पोलीस अधिकारी गावी येतो, पण एक मुलगी तिथं पोहोचते आणि मग सुरू होतो एक वेगळा खेळ... हे नेमकं प्रकरण काय आहे, एन्काऊंटर आणि अत्तर यांचा काय संबंध असतो, ती मुलगी नेमकी कोण असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मोठ्या पडद्यावरच मिळणार आहेत. प्रचंड गुंतागुंत, सायकोलॉजिकल गोष्ट, उत्तम स्टारकास्ट, रंजक कथानक सिनेमात पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा अनेक महोत्सवांमध्ये गौरवण्यात आला आहे. 1 जानेवारी 2026 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अमरावतीतील प्रसिद्ध भजी पोहे, 30 रुपयांत भरेल पोट, अशी चव कुठंच नाही Video
सर्व पहा

मॅजिक या सिनेमाची निर्मिती तुतरी व्हेेंचर्स या निर्मिती संस्थेच्या राजू सत्यम यांनी केली आहे. 'आई कुठे काय करते'सारख्या उत्तमोत्तम मालिकांचं दिग्दर्शन केलेल्या रवींद्र विजया करमरकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. योगेश विनायक जोशी, रवींद्र विजया करमरकर यांनी कथालेखन, तर योगेश विनायक जोशी, अभिषेक देशमुख यांनी पटकथा लेखन केलं आहे. केदार फडके यांची छायांकन, देवेंद्र भोमे, चिनार-महेश यांनी संगीत, दिनेश पुजारी, नयनेश डिंगणकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
पोलीस नाही खूनीये मी..! एन्काऊंटर स्पेशलिस्टचा सायकोलॉजिकल ड्रामा, 'मॅजिक'चा थरारक खेळ या दिवशी भेटीला  
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल