TRENDING:

Shiv Thakare House Fire : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेच्या घरात भीषण आग! नेमकं काय घडले? समोर आला भयंकर VIDEO

Last Updated:

Fire at Shiv Thakare's House: शिव ठाकरेच्या मुंबईतील गोरेगाव येथील घरात नुकतीच भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्याच्या घराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: 'रोडीज', 'बिग बॉस मराठी' आणि 'बिग बॉस' हिंदीमधून तुफान लोकप्रियता मिळवणारा मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे याच्या चाहत्यांसाठी एक शॉकिंग बातमी समोर आली आहे. शिव ठाकरेच्या मुंबईतील गोरेगाव येथील घरात नुकतीच भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, या घटनेत शिवला कोणतीही दुखापत झाली नाही, पण त्याच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
News18
News18
advertisement

नेमकं काय घडलं?

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शिवच्या घराचे व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. आग लागल्यामुळे घरातील मालमत्तेचे झालेले नुकसान झाल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते. अग्नीशमन दलाचे जवान आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तपास करत होते. शिव ठाकरे राहत असलेल्या कोळते पाटील वरवे इमारतीमधील त्याच्या घरात ही आग लागली.

advertisement

'आपल्या बापजाद्यांनी इथं इतिहास घडवला', रायगडावरील स्थिती पाहून प्रवीण तरडे कडाडले, VIDEO

शिव ठाकरेची टीम आणि विरल भयानी यांनीही माहिती दिली की, शिव ठाकरे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. आग लागण्याची घटना घडली तेव्हा शिव ठाकरे मुंबईत नव्हता. तो एक दिवसापूर्वीच शहरात परतला होता.

शिवच्या टीमने जारी केलेल्या अधिकृत नोटमध्ये म्हटले आहे की, "@shivthakare9 च्या घरी आज सकाळी एक मोठा अपघात घडला. कोळते पाटील वरवे इमारतीतल्या त्याच्या मुंबईतील घरात आग लागली. सुदैवाने अभिनेत्याला कोणतीही दुखापत झालेली नाही, पण घराचे नुकसान झाले आहे." विशेष म्हणजे, अपघाताच्या एक दिवस आधीच शिवने एअरपोर्टवरून एक फोटो शेअर करत "मुंबई वापसी" असे लिहिले होते.

advertisement

शिव ठाकरेचा इंडस्ट्रीमधील थक्क करणारा प्रवास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
क्रिकेटचं स्वप्न अपूर्ण राहिलं, 50000 रुपये गुंतवणुकीत केला व्यवसाय, सात पट कमाई
सर्व पहा

शिव ठाकरेने एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये रिॲलिटी शोच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'रोडीज'पासून सुरू झालेला त्याचा प्रवास 'बिग बॉस मराठी', त्यानंतर 'बिग बॉस' हिंदी, 'खतरों के खिलाडी' आणि 'झलक दिखला जा'पर्यंत यशस्वी ठरला. तो नुकताच रश्मी देसाईसोबत 'राज राज नाचन' या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसला होता.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Shiv Thakare House Fire : 'बिग बॉस' फेम शिव ठाकरेच्या घरात भीषण आग! नेमकं काय घडले? समोर आला भयंकर VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल