महेश कोठारे यांच्या सपोर्ट करत मेघाने, शिवसेना आणि मनसे पक्षावरही टीका केली आहे. उर्मिला मातोंडकर, महेश कोठारे यांचीही नावे घेतली आहे. मेघाने पोस्टमध्ये लिहिलंय, "अभिनेत्री उमिला मातोंडकरने उध्दव सेना जॉइन केली होती तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्याने तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता. सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरने तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती तरी कोणी आक्षेप घेतला नाही. परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की उध्दव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली."
advertisement
('सूनबाई अडकल्या म्हणून आता मोदीभक्तीने पछाडलं', महेश कोठारेंच्या वक्तव्यावर ठाकरे सेनेचा हल्लाबोल)
मेघाने पुढे लिहिलंय, "हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही. एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे. जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवार करतोय. जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय. त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उध्दव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे."
मेघाने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं, जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं. आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे. बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण, कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना"