"आम्ही एक धरण बांधू..."
कोलकात्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी पाकिस्तानचं नाव न घेता टोला लगावला. ते म्हणाले, "जर तुम्ही अशा गोष्टी बोलत राहिलात आणि आमच्या गुप्तहेर संस्थेने एकदा ठरवलं, तर मग एकानंतर एक ब्रह्मोस क्षेपणास्त्र धडाधड जातील."
सिंधू पाणी करार या मुद्द्यावरून पाकिस्तानने भारताला धमकी दिल्यावर मिथुन चक्रवर्ती यांनी एक मजेदार टोला मारला. ते म्हणाले, "आम्ही एक धरण बांधण्याचा विचार करत आहोत, जिथे १४० कोटी लोकं एकत्र लघवी करतील. त्यानंतर आम्ही ते धरण उघडलं, तर त्सुनामी येईल." मात्र, त्यांनी हेही स्पष्ट केलं की, त्यांचं हे विधान पाकिस्तानमधील लोकांविरोधात नसून बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्याला उत्तर होतं.
advertisement
'पाणी नाही दिलं तर युद्ध करू!'
बिलावल भुट्टो यांनी सिंध सरकारद्वारे आयोजित एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला दिलं नाही, तर युद्ध होऊ शकतं. त्यांनी भारतावर आरोप केला होता की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंधू नदीवरील जल परियोजना पाकिस्तानच्या जल सुरक्षेसाठी धोकादायक आहे. त्यांनी हेही म्हटलं की, भारताच्या मे महिन्यात झालेल्या लष्करी पराभवामुळे असं होत आहे.
बिलावल भुट्टो यांच्या धमकीपूर्वी पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल असीम मुनीर यांनीही भारताला अण्वस्त्र वापरण्याची धमकी दिली होती. 'जर भारताच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला, तर पाकिस्तान त्याच्याकडील अण्वस्त्रांचा वापर करू शकतो,' असं ते म्हणाले होते.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर उत्तर दिलं की, 'पाकिस्तानच्या या नव्या अण्वस्त्र धमकीमुळे त्यांच्या अण्वस्त्र कमांड आणि कंट्रोलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.' भारत कोणत्याही अण्वस्त्र ब्लॅकमेलिंगपुढे झुकणार नाही आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचं संरक्षण करेल, असंही मंत्रालयाने स्पष्ट केलं.