काय आहे 'जीव रंगला'ची Inside Story
'जोगवा' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या मुक्ता बर्वेने नुकतंच एका मुलाखतीत 'जीव रंगला' या गाण्याची बॅक स्टोरी सांगितलं आहे. मुक्ता म्हणाली,"जीव रंगला' हे गाणं जे शूट केलं आहे ते अजयने गायलेल्या ट्यूनवर आम्ही शूट केलं आहे. हरिहरन सर आणि श्रेया हे ग्रेटच आहेत. ते गाणं आज प्रत्येकाच्या हृदयात आहे. पण अजयचं ज्यांनी गाणं ऐकलंय आणि त्यावर ज्यांनी शूट केलंय त्यांना ते वर्जन जास्त जवळचं, ओळखीचं आणि आवडतं वाटतं. कारण शब्दही पूर्ण नव्हते. फक्त ट्यून होती. अख्ख शूट त्याच्यावर झालंय. अजयची जी आर्त लागते. ती जी तंद्री लागते ते किकसारखं आहे. म्हणजे तुमच्यावर चढतं ते गाणं. तसं ते चढलं होतं आम्हाला. त्यावेळी माझ्याकडे नोकियाचा छोटा फोन होता. त्याच्यावर किती तरी दिवस ते होतं आणि त्यावर आम्ही ते ऐकायचो".
advertisement
'जीव दंगला गुंगला रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू' अशा शब्दांनी 'जीव रंगला' हे गाणं सुरू होतं. आजही हे गाणं अनेकांच्या मनात घर करुन आहे. काही दिवसांपूर्वी अरिजीत सिंहने पुण्यातील एका कॉन्सर्टमध्ये हे गाणं गायलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा हे गाणं चर्चेत आलं होतं.
