तुम्हाला अशा एका अभिनेत्रीचा सुरुवातीचा संघर्ष सांगणार आहोत, जी आजच्या घडिला एका पेक्षा एक धमाकेदार सिनेमे देत आहे. तिच्या इंटीमेट सीनमुळे आजही ती चाहत्यांमध्ये फेमस आहे. 'मर्डर' फेम मल्लिका शेरावर हिच्याविषयी आपण बोलत आहोत. मर्डर सिनेमात एकापेक्षा एक इंटीमेट सीन देऊन सगळीकडे हंगामा केला होता. महत्वाचे म्हणजे या सिनेमा क्षेत्रात येण्यासाठी या उज्वल यशाच्या शिखावर पोहोचण्यासाठा ती अगदी स्वतःच्या घरातील लोकांच्या विरोधात गेली होती. तिला स्वतःच्या बळावर काहीतरी करुन दाखवायचे होते. यासाठी कुटूंबाची साथ मिळो न मिळो पण तिला या क्षेत्रात झोकून काम करायचे होते हे तिने मनाशी पक्के केले होते.
advertisement
या गोष्टीचे वाईट वाटते
आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने मल्लिकाने बॉलिवूडमध्ये एक चांगली ओळख केली आहे. तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, "मला कायम वाईट वाटते की माझ्या कुटूंबाने कधीच म्हटले नाही की तुझा आम्हाला खूप अभिमान वाटतो. मी सुंदर दिसण्यासाठी कधीच प्लास्टिक सर्जरी केली नाही. मी हरियाणामधून मुंबई मध्ये आली. कुटूंब कायमच विरोधात होते. मी माझ्या मनाने या क्षेत्रात आले. माझ्याकडे तेव्हा साधे दहा रुपयेही नव्हते."
एयर होस्टेसची नोकरी करत होती
मल्लिका सुरुवातीच्या काळात एयर होस्टेसची नोकरी करत होती. त्या दरम्यान पायलट करण सिंह गिल सोबत तिची ओळख झाली. त्यानंतर तिने त्याच्याशी लग्न केले. त्याकाळात तिला सिनेमाची ऑफर मिळत होती. लग्न झालेले असल्याने त्याचा परीणाम माझ्या करियरवर होऊ शकतो, असे तिला वाटत होते म्हणून तिने आपले लग्न झाले हे कुणाला सांगितले नव्हते. त्यानंतर तिने आपल्या अभिनय करियरकडे लक्ष दिले. लग्नानंतर चार वर्षांनी तिचा घटस्फोट झाला. तिने अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासोबत जाहीरातींमध्ये काम केले होते. त्यानंतर तिने सिनेमात काम केले. मॉडेलिंग पासून ते अभिनेत्री असा तिचा प्रवास आहे.
