Famous Temple: लोणार सरोवराजवळ 800 वर्षे पुरातन मंदिर, थेट इराणशी कनेक्शन, दैत्यसुदन मंदिराचा इतिहास काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Daityasudan Temple: लोणार सरोवाराजवळ पुरातन दैत्यसुदन मंदिर आहे. हे मंदिर इराण आणि चालुक्य राजाच्या मैत्रीचं प्रतिक मानलं जातं.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रमध्ये विविध प्रकारची प्राचीन मंदिरे आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे. याच परिसरात देखील काही प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकीच एक ऐतिहासिक मंदिर म्हणजे दैत्यसुदन मंदिर होय. अतिशय प्राचीन असणाऱ्या या मंदिराचा इतिहास देखील तितकाच रंजक आहे. याबाबत अभ्यासक संतोष जाधव यांनी माहिती दिली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या ठिकाणी असलेल्या काही मंदिरांपैकी दैत्यसूदन मंदिर हे अतिशय प्राचीन आहे. हे मंदिर बाराव्या शतकातील आणि चालुक्यकालीन आहे. इराणचा राजा खुसरोग आणि चालुक्य राजा यांच्या मैत्रीचं प्रतिक असलेलं हे मंदिर आहे. या मंदिराच्या मागच्या बाजूला इराणीय संस्कृतीचा प्रभाव असलेला शैली आहे.
advertisement
दैत्यसुदन मंदिर येथे एक सूर्य देखील आहे. सर्वात मोठा सौर दिन असतो, त्या दिवशी या मंदिरामध्ये पाच दिवस किरणोत्सव होतो. मंदिराच्या वरती एक छोटसं छिद्र आहे आणि त्यातून सूर्यकिरणे देवाच्या मूर्तीवर पडतात.
परकीय आक्रमणामुळे हे मंदिर पांढऱ्या मातीखाली दबलेलं होतं. या ठिकाणच्या स्मामींनी ते पुन्हा काढलं. पण या मंदिरातील भगवान विष्णूची मूळ मूर्ती आढळली नाही. त्यामुळे स्वामींनी नागपूरकर भोसलेंना सांगून मूर्ती बनवून घेतली. अतिशय प्राचीन असणाऱ्या या मंदिरावर आकर्षक शिल्पे आहेत. जर लोणार सरोवर पाहण्यास जाण्याचा प्लॅन असेल तर हे मंदिर आवर्जून पाहावं असं आहे, असं जाधव सांगतात.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
October 25, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/Temples/
Famous Temple: लोणार सरोवराजवळ 800 वर्षे पुरातन मंदिर, थेट इराणशी कनेक्शन, दैत्यसुदन मंदिराचा इतिहास काय?

