या मालिकेने अभिनेता राकेश बापट आणि अभिनेत्री वल्लरी विराज या फ्रेश जोडीला छोट्या पडद्यावर आणलं आणि पहिल्या दिवसापासूनच या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. 'एजे' आणि 'लीला'ची केमिस्ट्री तर इतकी हिट झाली की, २०२४ च्या 'झी मराठी' पुरस्कार सोहळ्यात या मालिकेने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली! पण आता ही लोकप्रिय मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे.
advertisement
मालिकेतील अभिनेत्रीनेच केला खुलासा
मागील काही दिवसांपासून 'नवरी मिळे हिटलरला' मालिका बंद होणार असल्याच्या चर्चा जोर धरत होत्या. मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारणाऱ्या सानिका काशीकर हिनेही तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधून या बातमीला दुजोरा दिला होता. आणि आता, मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा चेहरा, म्हणजे भूमिजा पाटील हिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओचं थंबनेल वाचूनच चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला! थंबनेल होतं - "सेटवरचे अखेरचे काही दिवस...!" या व्हिडिओमुळे आता हे स्पष्ट झालं आहे की 'एजे' आणि 'लीला'ची ही रोमँटिक कहाणी लवकरच संपणार आहे.
Babil Khan : बॉलिवूडवर भडकला बाबिल खान, घेतली स्टारकिड्सची नावं, अखेर आईला करावी लागली सारवासारव
भूमिजाने दाखवली सेटवरची मजा-मस्ती
भूमिजाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सेटवरची मजा-मस्ती, कलाकारांमधील गप्पागोष्टी आणि शेवटच्या काही दिवसांमधील आठवणी दिसत आहेत. विशेष म्हणजे, मालिकेच्या एका खास चाहतीने सेटला भेट दिली आणि सगळ्या कलाकारांसाठी एक सुंदर कविता लिहिली! त्या चाहतीने आपल्या कवितेतून मालिकेच्या टीमला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ती म्हणाली, "बरोबर वर्षाभराआधी एका नव्या मालिकेचे काही क्युट प्रोमो आम्ही पाहिले. ते प्रोमो पाहून मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली होती. मालिकेचं वेगळं नाव आणि याची आगळीवेगळी प्रेमकथा सर्वांसाठी लक्षवेधी ठरली. मुख्य हिरो-हिरोईनची केमिस्ट्री एकदम जबरदस्त होती. एक रागीट हिरो आणि चंचल, सतत उत्सुकता असणारी हिरोईन…या दोघांच्या प्रेमाचा प्रवास एकदम क्रेझी होता. या मालिकेच्या संपूर्ण टीमला खूप-खूप शुभेच्छा…कारण, ही फक्त सुरुवात आहे अजून खूप प्रवास बाकी आहे. Lots Of Love."
मालिका बंद न करण्याची प्रेक्षकांची विनंती
दरम्यान, भूमिजाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अक्षरशः कमेंट्सचा पाऊस पाडला आहे! "प्लीज 'नवरी मिळे हिटलरला' मालिका बंद करू नका", "प्लीज या मालिकेची वेळ बदला म्हणजे टीआरपी वाढेल पण बंद करू नका", "लीला तुझी आणि एजे जोडी खूप छान…आम्ही कधीच विसरू शकणार नाही" अशा अनेक प्रतिक्रिया देत चाहते आपली नाराजी आणि प्रेम व्यक्त करत आहेत. आता 'एजे' आणि 'लीला'ची ही अनोखी प्रेमकथा, राकेश बापट आणि वल्लरी विराज यांच्या केमिस्ट्रीची जादू छोट्या पडद्यावर दिसणार नाही, याची खंत त्यांच्या चाहत्यांना नक्कीच असेल.
