Netflix Series : नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक नवी सीरिज रिलीज झाली आहे. 'हिज अँड हर्स' असं या सीरिजचं नाव आहे. ही वेब सीरिज अॅलिस फिनी यांच्या 2020 मधील बेस्टसेलिंग यांच्या ‘हिज अँड हर्स’ या कादंबरीवर आधारित आहे. 8 जानेवारी 2026 रोजी ही सीरिज नेटफ्लिक्सवर रिलीज झाली असून तिने टॉप 10 मध्येही स्थान मिळवले आहे.
advertisement
‘हिज अँड हर्स’ ही पती-पत्नीभोवती फिरणारी मर्डर मिस्ट्री आहे. टेसा थॉम्पसन अॅना अँड्र्यूजची भूमिका साकारत आहे, जी एक न्यूज रिपोर्टर आहे आणि आपल्या होमटाउनमधील एका हत्येचा तपास करते. दुसरीकडे, जॉन बर्नथल जॅक हार्पर या डिटेक्टिवच्या भूमिकेत आहे, जो त्याच खुनाचा तपास करत आहे. दोघांनाही एकमेकांवर संशय आहे आणि कथा दोन दृष्टिकोनांतून मांडली जाते ‘हिज’ आणि ‘हर्स’.
प्रत्येक भागात सत्याचे वेगवेगळे पैलू उलगडत जातात. ही सीरिज खोटेपणा, विश्वासघात, प्रेम आणि सूड अशा अनेक गोष्टींना स्पर्श करते. ज्यामुळे प्रेक्षक शेवटपर्यंत खिळून राहतात. दिग्दर्शक विल्यम ओल्डरॉइड यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारी सीरिज
‘हिज अँड हर्स’ या सीरिजमध्ये ‘क्रीड’ आणि ‘थॉर’ फिल्म सीरिजमधून ओळखली जाणारी टेसा थॉम्पसन येथे एका त्रस्त पण स्ट्राँग महिलेची भूमिका साकारताना दिसून येते. जी आपल्या भूतकाळातील आघातांशी झुंज देत आहे. तिच्या डोळ्यांमधील वेदना आणि संशय प्रेक्षकांना गुंतवून ठेवतात. ‘द पनिशर’ मधून प्रसिद्ध झालेला जॉन बर्नथल जॅकच्या भूमिकेत रफ अँड टफ डिटेक्टिव म्हणून दिसतो, पण त्याच्यासोबत त्याची असुरक्षित बाजूही दाखवण्यात आली आहे. सपोर्टिंग कास्टमध्ये पाब्लो श्राइबरनेही उत्तम काम केले असून तो कथेत नवा ट्विस्ट आणतो. सिनेमॅटोग्राफी विशेषतः प्रशंसनीय आहे.
‘हिज अँड हर्स’ ही सीरिज थ्रिलर जॉनरमधील क्लासिक ट्रॉप्सना नवा ट्विस्ट देते. ‘गॉन गर्ल’ किंवा ‘शार्प ऑब्जेक्ट्स’ प्रमाणेच, येथे जेंडर डायनॅमिक्स आणि मीडियाच्या भूमिकेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अनेक थ्रिलर वरवरचे राहतात, पण ‘हिज अँड हर्स’ खोलात जाते. नेटफ्लिक्सने फक्त 6 भागांत संपूर्ण कथा मांडली आहे, जी बिंज-वॉचिंगसाठी अगदी परफेक्ट आहे. जर तुम्हाला थ्रिलर आवडत असतील, तर ही सीरिज तुमच्यासाठी परफेक्ट आहेय
