2003मध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओची स्थापना केली. त्यांचा हा स्टुडिओ मुंबईपासून जवळ कर्जत येथे 43 एकरच्या जमिनीवर आहे. स्टुडिओमध्ये 25000 फुटांचा एक विशाल डायनोसॉर फ्लोर, प्रॉप्स चेंबर आणि रॉयल पॅलेस, किल्ले, शहर, गावांचे ग्रँड लोकेशन्स आहेत. नितीन देसाई यांच्या या भव्य सेटला भारतातील पहिलं थीम पार्क म्हटलं जातं.
हेही वाचा - Nitin Desai : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी संपवलं आयुष्य; कलाविश्वात खळबळ
advertisement
2003 साली तयार करण्यात आलेल्या या एनडी स्टुडिओला नुकतील 20 वर्ष पूर्ण झालीत. एकेकाळी नितीन देसाई या स्टुडिओमध्ये एकाच वेळी 28 प्रोजेक्टवर काम करायचे. आजवर त्यांनी 198 हून अधिक सिनेमे 200 हून अधिक टेलिव्हिजन मालिका आणि 350 हून अधिक गेम शोसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.
‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, 'परिंदा', 'डॉन', सारख्या भव्य सिनेमांचे सेट नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारले होते. कलाकार सिनेमाचं शुटींग संपवून पॅक अप झाल्यानंतरही सेटवर थांबून राहायचे. नितीन देसाई यांनी साकारलेल्या भव्य सेटवरून कलाकारांचा पाय निघत नसे.
कर्जत येथे असलेला एनडी स्टुडिओ काही महिन्यांपासून बंद असल्याचं म्हटलं जात आहे. एनडी स्टुडिओ पाहण्यासाठी अनेक लोक तिथे भेट देत होते. एनडी स्टुडिओ पाहण्यासाठी पर्यटकांची देखील मोठी गर्दी पहायला मिळत होती. सोशल मीडियावर एनडी स्टुडिओचे अनेक व्हिडीओ रील्सच्या स्वरूपात पाहायला मिळत असतात.
