विशाल भारद्वाजने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केली आहे. त्या व्हिडिओमध्ये विशाल एका ठिकाणी गाणं गाताना दिसत आहे. विशाल आपल्या आवाजामध्ये 'डर लगता है मुझको तू जाने वाला है, मुझे इश्क हुआ है, ये होने वाला है.' आणि व्हिडिओ विशालने अरिजितला टॅग केली आहे. विशालने शेअर केलेली ही व्हिडिओ अरिजितने शूट केलेली असल्याचे त्याने सांगितले आहे. विशालने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, "अरिजीत... काही दिवसांपूर्वी आपण एक गाणं गात होतो आणि तूच तो व्हिडिओ शूट केला आहे. तेव्हा मला माहित नव्हतं की, हे तुझ्यासोबतचं माझं शेवटचं गाणं असेल म्हणून, पण हे unacceptable आहे." विशाल भारद्वाजसोबत त्यांची पत्नी आणि गायिका रेखा भारद्वाज देखील व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
advertisement
अरिजीत सिंगने विशाल भारद्वाजसोबत त्याने दिग्दर्शित केलेला आणि कथा लिहिलेल्या 'ओ रोमियो'साठी एकत्र काम केले आहे. 'ओ रोमियो' चित्रपटातील "हम तो तेरे लिए थे" हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले आणि त्याला प्रेक्षकांकडून दमदार चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'ओ रोमियो' या ॲक्शन चित्रपटात शाहिद कपूरसह तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असून हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, मंगळवारी, 27 जानेवारी रोजी अरिजीतने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मागील अनेक वर्षांत मला दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. मला सांगताना आनंद होत आहे की आता मी पार्श्वगायक म्हणून कोणतीही नवीन कामं स्वीकारणार नाही. मी हा प्रवास संपवत आहे. हा एक अद्भुत प्रवास होता.”
