TRENDING:

Shahid Kapoor: ज्याने प्रसिद्धी दिली, त्याबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला; 'ओ रोमियो'च्या रिलीज पूर्वी अभिनेता काय म्हणाला?

Last Updated:

सध्या शाहिद 'ओ रोमियो'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र असताना त्याने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे. त्याने चित्रपटाच्या क्वालिटी लेव्हलवरच थेट भाष्य केलं असून प्रेक्षकांबद्दलही भाष्य केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या 'ओ रोमियो' चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. 'देवा' चित्रपटानंतर अभिनेता फार मोठ्या ब्रेकनंतर प्रेक्षक चित्रपटांच्या भेटीला येणार आहे. सध्या शाहिद प्रमोशनमध्ये व्यग्र असताना त्याने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूड चित्रपटांबद्दल भाष्य केलं आहे. त्याने चित्रपटाच्या क्वालिटी लेव्हलवरच थेट भाष्य केलं असून प्रेक्षकांबद्दलही भाष्य केलं आहे. अभिनेत्याची ही प्रतिक्रिया सध्या कमालीची चर्चेत आली आहे. ज्या पद्धतीने सध्या बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवले जात आहेत, त्यावर अभिनेत्याने भाष्य केले असून त्याची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
Shahid Kapoor: ज्याने प्रसिद्धी दिली, त्याबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला; 'ओ रोमियो'च्या रिलीज पूर्वी अभिनेता काय म्हणाला?
Shahid Kapoor: ज्याने प्रसिद्धी दिली, त्याबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला; 'ओ रोमियो'च्या रिलीज पूर्वी अभिनेता काय म्हणाला?
advertisement

एका पॉडकास्टमध्ये बोलताना शाहिद कपूर म्हणाला की, "मला केव्हाही खोट्या पब्लिसिटीवर विश्वास बसत नाही. कोणत्याही चित्रपटासाठी फक्त पीआर नाही तर, मार्केटिंग सुद्धा गरजेचं असतं. आपण किती बरोबर आहोत किंवा किती चुकीचे आहोत, याचा सुद्धा आपण विचार करायला हवा. लोकं समजतच नाहीये, जीवनाची अशी एक जादू आहे की, लोकांनी खचाखच भरलेल्या एका रूममध्ये तुमच्यासाठी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला आपल्यापेक्षा वरचा दर्जा तेव्हा दिला जातो. ही खूपच चांगली गोष्ट आहे. यासाठी तुमच्यामध्ये ती कलाअवगत असायला हवी. पण जेव्हा शुद्धता हरवून जाते, त्यामध्ये काही बनावटी गोष्टी मिसळवल्या जातात, तेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये स्वारस्य राहत नाही."

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंबाचे दरही तेजीत, आल्याची काय स्थिती?
सर्व पहा

शाहिद कपूरने कलाकार प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचे प्रमाण कसे कमी होत आहे, याबद्दलही सांगितले. तो म्हणाला, "पाहा, दोन्ही बाजूंनी मेणबत्ती जळत आहे. प्रेक्षक संयम गमावत आहेत. तुम्ही त्यांचा मेंदू एका गोष्टीवर स्थिर नाही ठेवू शकत. त्यांना उत्तेजन आणि विश्रांतीची आवश्यकता आहे, कारण त्यामुळे डोपामाइनची पातळी वाढते. निर्माते स्वतःशीही असेच करत आहेत, म्हणून जेव्हा ते लक्ष केंद्रित करून काम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची निर्मिती करण्याची क्षमता प्रभावित होते. असे नाही की प्रेक्षक चित्रपट पाहू इच्छित नाहीत, हे देखील खरे आहे की आपण जितके चांगले चित्रपट बनवायला हवे तितके बनवत नाही. म्हणून ही दोन्ही बाजूंची प्रोसेस आहे." विशाल भारद्वाज दिग्दर्शित, 'ओ रोमियो' चित्रपटात शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Shahid Kapoor: ज्याने प्रसिद्धी दिली, त्याबद्दल शाहिद कपूर स्पष्टच बोलला; 'ओ रोमियो'च्या रिलीज पूर्वी अभिनेता काय म्हणाला?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल