1989 साली आलेला ‘चांदनी’ हा चित्रपट म्हणजे त्या दशकातील एक अमर प्रेमकथा. यश चोप्राच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात श्रीदेवी, ऋषी कपूर आणि विनोद खन्ना यांच्या अभिनयाची जादू पहायला मिळाली. आज या तिघांपैकी एकही कलाकार हयात नाहीत. एका ब्लॉकबस्टर सिनेमातील 3 सुपरस्टारचा मृत्यू कशामुळे झालेला यावर एक नजर टाकूया.
माझं वेगळं स्थान, मी श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित नाही; असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
advertisement
या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या श्रीदेवी यांचे 2018 मध्ये दुबईत एका लग्नसमारंभादरम्यान अकस्मात निधन झाले. हृदयविकाराचा झटका ही कारणामुळे निधन झाल्याचं सांगितलं. तिच्या अचानक निधनाने सारा देश हळहळला.
विनोद खन्ना यांना कर्करोग झाला होता आणि त्यांनी 2017 मध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि आवाज अजूनही लोकांच्या मनात घर करून आहे. ऋषी कपूर यांचं 30 एप्रिल 2020 रोजी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत असताना निधन झालं. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली होती.
दरम्यान, या चित्रपटात सुरुवातीला रेखा यांना मुख्य भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण त्यांनी श्रीदेवीचं नाव सुचवलं. हेच श्रीदेवीच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरलं. ‘चांदनी’तील संगीत आजही प्रेक्षकांच्या मनात गूंजतं. ‘मेरे हाथों में नौ-नौ चूडियां हैं’ किंवा ‘तेरे मेरे होते एक सपना’ सारखी गाणी आजही जुनी आठवण जागी करतात.