Varsha Usgaonker: माझं वेगळं स्थान, मी श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित नाही; असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर?

Last Updated:

Varsha Usgaonker: मराठीतील एव्हरग्रीन सौंदर्य, प्रतिभा आणि स्टारडम यांचं अनोखं मिश्रण म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगांवकर. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.

वर्षा उसगांवकर
वर्षा उसगांवकर
मुंबई : मराठीतील एव्हरग्रीन सौंदर्य, प्रतिभा आणि स्टारडम यांचं अनोखं मिश्रण म्हणजे अभिनेत्री वर्षा उसगांवकर. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आजही लोक त्यांच्यासाठी वेडे आहेत. पण एक काळ होता लोकांनी त्यांना मराठीतील श्रीदेवी आणि माधुरी अशी उपमा दिली होती. अनेक वर्षांनंतर आता त्यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
नुकत्याच दिलेल्या 'लोकमत फिल्मी' च्या मुलाखतीमध्ये वर्षा करिअरमधील अनेक गोष्टींविषयी बोलल्या. कारकिर्दीचा प्रवास मोकळेपणाने उलगडला. त्या म्हणाल्या, “मराठी चित्रपटात मी जे स्थान मिळवलं, ते सहज नाही मिळालं. ते स्थान मला दिलं लेखक, दिग्दर्शक आणि माझ्या प्रेक्षकांनी.”
advertisement
वर्षा म्हणाल्या, “लोक मला मराठी चित्रपटांची श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित म्हणायचे. पण मला ‘मीच’ असण्याची ओळख महत्त्वाची वाटते. मी कोणाचं अनुकरण नाही केलं, मी ‘वर्षा उसगांवकर’ म्हणूनच लोकांच्या मनात राहू इच्छिते.” माझं वेगळं स्थान निर्माण झालं मी याचं श्रेय सतिश कुलकर्णीला देते. त्याने वंडरगर्ल हे नाव मला दिलं. गंमत जंमत सिनेमानंतर मला रोल आहे ते सगळे स्त्रीप्रधान आले.
advertisement
पुढे वर्षा म्हणाल्या, त्या काळी अशोक-लक्ष्या यांची लाट नक्कीच होती. पण, मी भूमिका निवड करून घेतल्या. ‘पसंत आहे मुलगी’, ‘रेशीमगाठी’, ‘खट्याळ सासू नाटाळ सून’, ‘यज्ञ’, ‘पैंजण’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ हे सगळे चित्रपट अभिनेत्रीकेंद्रित होते. या चित्रपटातील भूमिका साकारताना मला माझं अभिनय कौशल्य दाखवता आलं आणि त्यामुळे माझं वेगळं स्थान निर्माण झालं,” ज्यामुळे माझा अभिनय माझं काम अधिक प्रभावी ठरलं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Varsha Usgaonker: माझं वेगळं स्थान, मी श्रीदेवी किंवा माधुरी दीक्षित नाही; असं का म्हणाल्या वर्षा उसगांवकर?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement