ओटीटीवरील सर्वाधिक पाहिलेल्या गेलेल्या वेबसीरिजमध्ये जबरदस्त रोमँटिक ड्रामा दाखविण्यात आला आहे. पूर्वीच्या काळचं प्रेम, नात, समाज, संस्कृती या सीरिजमध्ये अतिशय उत्तमरित्या दाखविण्यात आली आलं आहे. अनेक चढ-उतार या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळतील. पूर्वीच्या काळची सामाजिक रचना या चित्रपटात उत्तमरित्या दाखविण्यात आली आहे. त्यावेळी लोकांची विचार करण्याची पद्धत कशी होती हे या सिनेमात पाहायला मिळेल. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले आहेत. या तिन्ही सीझनला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळत आहे. आता प्रेक्षकांना चौथ्या सीझनची प्रतीक्षा आहे.
advertisement
जगभरातील प्रेक्षकांनी सर्वाधिक पाहिलेली वेबसीरिज 2020 मध्ये आलेली एक अमेरिकन पीरियड रोमान्स सीरिज 'ब्रिजर्टन' ही आहे. क्रिस वॅन ड्यूसेन यांनी ही सीरिज बनवली आहे. शोंडा राइम्सच्या शोंडा राइम्सच्या शोंडालँड या निर्मितीसंस्थेचा हा नेटफ्लिक्ससाठीचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. जूलिया क्विन या कांदबरीवर आधारित हा चित्रपट आहे. वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी या सीरिजचे वेगवेगळे एपिसोड दिग्दर्शित केले आहेत. अनेक शानदार कलाकार या सीरिजमध्ये एकत्र झळकले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे ओटीटीवरील सर्वाधिक पाहिलेल्या सीरिजमध्ये ही अग्रस्थानी आहे.
'ब्रिजर्टन' या सीरिजमध्ये लीजच्या भूमिकेत निकोला कौघलन (पैनेलोप), ल्यूक न्यूटन (कॉलीन), क्लाउडिया (एलोइज), फोएबी डाइनिवर (डैफने), जोनाथन बेली (एंथनी) आणि रेगे-जीन पेज (सायमन) सारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये जूली एंड्रयूजने लेडी व्हिसनडाउनचा आवाज दिला आहे. 19 व्या दशकातील लंडनमधील गोष्टी या सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. ब्रिजर्टन कुटुंबातील आठ भाऊ-बहिणी, त्यांचं प्रेम, लग्न, समाजात टिकाव धरणं यावर बेतलेली ही सीरिज आहे. भावा-बहिणींची गोड लव्ह-स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
'ब्रिजर्टन' या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तसेच या सीरिजचा 'क्लीन शार्लट' हा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रत्येक सीझनमध्ये आठ एपिसोड आहेत. हा प्रत्येक एपिसोड 55 ते 70 मिनिटांचा आहे. 'ब्रिजर्टन' या सीरिजचा पहिला भाग प्रदर्शित झाला तेव्हा 28 दिवसांत तब्बल 82 मिलियन लोकांपेक्षा जास्त मंडळींनी पाहिली आहे. IMDB वर या सीरिजला 7.4 रेटिंग मिळाले आहेत. दुसऱ्या भागाला 82% स्कोर मिळालं आहे. या सीरिजच्या कॉस्ट्यूम डिजाइन, पार्श्वसंगीत आणि कॅमेरावर्कचंही खूप कौतुक झालं आहे. सर्व गोष्टी संपन्न असणारी ही सीरिज प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करेल.