द बॅड्स ऑफ बॉलिवूड (The Bads of Bollywood)
कधी होणार रिलीज? 18 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा लेक आर्यन खानची 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' ही वेबसीरिज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या सीरिजच्या माध्यमातून आर्यन दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड' या सीरिजमध्ये सहरा बंबा, लक्ष्य, राघव जुयाल आणि बॉबी देओलसह अनेक कलाकार झळकतील. 18 सप्टेंबरला ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
advertisement
द ट्रायल-सीझन 2 (The Trial 2)
कधी होणार रिलीज? 19 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? जिओ हॉटस्टार
अभिनेत्री काजोलच्या 'द ट्रायल सीझन 2' या वेबसीरिजमध्ये कोर्टरूम-ड्रामा पाहायला मिळणार आहे. मागील वर्षी रिलीज झालेल्या 'द ट्रायल'चा हा दुसरा भाग आहे. 'द ट्रायल सीझन 2' या सीरिजमध्ये काजोलसह कुब्रा सैत आणि शीबा चड्ढादेखील दिसणार आहेत. जिओ हॉटस्टारवर ही सीरिज 19 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
ब्लॅक रॅबिट
कधी होणार रिलीज? 18 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
थरार, नाट्य असणारी 'ब्लॅक रॅबिट' ही वेबसीरिज नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जॅक बेयलिन आणि केट सुसमैनची ही सीरिज येत्या 18 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सीरिजमध्ये जूड लॉ आणि जेसन बेटमॅन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
द ट्रेजर हंटर्स
कधी होणार रिलीज? 15 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? जिओ हॉटस्टार
'द ट्रेजर हंटर्स' हा खेळासंदर्भात असणारा नवा कार्यक्रम 15 सप्टेंबरपासून जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. मनीषा रानी आणि तन्मय सिंह हा कार्यक्रम होस्ट करणार आहेत. 'द ट्रेजर हंटर्स' या कार्यक्रमात 10 सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स दिसणार आहेत. हे 10 सोशल मीडिया कंटेंट क्रिएटर्स मुंबईतील एका गुप्त खजिन्याचा शोध घेताना दिसतील.
शी सेड मे बी (She Said Maybe)
कधी होणार रिलीज? 19 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
'शी सेड मे बी' हा रोमँटिक विनोदी चित्रपट 19 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. बुकेट अलाकुस आणि एनजीओ द शॉने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सरकन केयूलू आणि कादजा रेमनसारखे कलाकार या सीरिजमध्ये झळकतील.
जेनरेशन V सीझन 2 (Gen V 2)
कधी होणार रिलीज? 17 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ
'द बॉयज यूनिवर्स'च्या 'जनरेशन V'चा दुसरा सीझन 17 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राईम व्हिडीओवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
ऐलिस इन बॉर्डरलँड सीझन 3
कधी होणार रिलीज? 25 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
वैज्ञानिक कथा असणारी 'ऐलिस इन बॉर्डरलँड सीझन 3' ही सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये ताओ त्सुचिया आणि केंटो यामाजाकी मुख्य भूमिकेत आहेत. 25 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर ही सीरिज प्रदर्शित होईल.
हॉन्टेड होटल
कधी होणार रिलीज? 19 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? नेटफ्लिक्स
हॉन्टेड होटल ही सीरिज 19 सप्टेंबरला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. क्रिस्टिना रिची आणि फिन वुल्फहार्ड या सीरिजमध्ये आई-मुलाच्या भूमिकेत दिसतील.
हाऊस मेट्स
कधी होणार रिलीज? 19 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? झी 5
'हाऊस मेट्स' या चित्रपटात अपारशक्ति खुराना आणि रिद्धी डोगरा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 19 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या सीरिजमध्ये नवविवाहित जोडप्याची गोष्ट दाखविण्यात आली आहे. झी 5 वर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
एलियो
कधी रिलीज होणार? 17 सप्टेंबर
कुठे पाहता येईल? जिओ हॉटस्टार
डिज्नी पिक्सारचा 'एलियो' हा अॅनिमेटेड चित्रपट 17 सप्टेंबरला जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. एका छोट्या मुलाच्या अवतीभोवती फिरणारं या चित्रपटाचं कथानक आहे.