या मार्केटमध्ये जवळपास 30 ते 40 डिझाईन्स असलेली ज्वेलरी उपलब्ध आहे आणि प्रत्येक वस्तू फक्त शंभर रुपयांत मिळते. दागिन्यांमध्ये गळ्यात घालायचे चोकर, लॉंग नेकलेस, मिड-लेंथ नेकलेस, ऑक्सिडाईजच्या बांगड्या, अंगठ्या, नोज पिन, कंबरपट्टा अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे.
फक्त 200 रुपयापासून नवरात्रीसाठी ड्रेस घ्यायचाय? नाशिकमध्ये आहे 'हे' बेस्ट ठिकाण
गरब्यासाठी खास बनवलेल्या डिझाईन्स ही या मार्केटची मोठी आकर्षणं आहेत. येथे घुंगरू लावलेले चोकर, रंगीबेरंगी मण्यांनी सजवलेले नेकलेस, मोरपंखाच्या डिझाईन्सचे हार मोठ्या प्रमाणात दिसतात. त्याचबरोबर कपाळावर घालण्यासाठीची मथापट्टी आणि टिक्का, केसांमध्ये अडकवण्यासाठीचे जुडा पिन, तसेच कानांवर लावण्यासाठीच्या वेगवेगळ्या डिझाईन्सही येथे उपलब्ध आहेत.
advertisement
इथल्या ज्वेलरीची खासियत म्हणजे या वस्तू केवळ स्वस्त दरात मिळतात असे नाही, तर त्या नव्या ट्रेंडनुसार आणि नवरात्रीच्या थीमनुसार बनवल्या जातात. त्यामुळे मुली आणि तरुणी या दागिन्यांना जास्त पसंती देतात.
हे मार्केट रोज सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते. इथे तुम्हाला नवरात्रानिमित्त लागणाऱ्या सर्व वस्तू अगदी कमी दरात मिळतात. बोरीवली पश्चिम स्टेशनपासून अगदी 2 मिनिटांवर मोक्ष प्लाझा जवळ हे मार्केट आहे.