जर तुम्हाला वीकेंडला कुटुंबासोबत बसून एखादा थरारक चित्रपट पाहायचा असेल, तर Amazon Prime Video वरील एका सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असूनही, प्रदर्शित होताच त्याने ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे.
मराठी सिनेमामुळे राजकारण तापलं, 'खालिद का शिवाजी' रिलीजविषयी मोठी अपडेट
आपण बोलत असलेल्या या सिनेमाचं नाव आहे, 'शो टाइम'. या सिनेमाची कथा एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. सूर्या (नवीन चंद्रा) आणि त्याची पत्नी (कामाक्षी भास्करला) यांच्या घरात एका रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलते. एका रात्री ते घरी आरामात टीव्ही पाहत असतात, पण त्यांना कल्पनाही नसते की लवकरच एक अशी घटना घडणार आहे, ज्यामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे विस्कटून जाईल. एका खुनाच्या घटनेमुळे त्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ या चित्रपटात अतिशय उत्तम प्रकारे दाखवण्यात आली आहे.
advertisement
चित्रपटाचे दिग्दर्शन मदन दक्षिणामूर्ती यांनी केले आहे. त्यांनी अत्यंत कमी बजेटमध्ये एक जबरदस्त क्राइम थ्रिलर बनवला आहे. यात नवीन चंद्रा, कामाक्षी भास्करला यांच्यासोबत व्हीके नरेश आणि राजा रवींद्र यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांच्या अभिनयामुळे कथेला आणखी बळकटी मिळाली आहे.
हा चित्रपट 4 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि तिथेही त्याने चांगली कमाई केली. मात्र, 25 जुलै 2025 रोजी तो Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आणि त्याने ओटीटीच्या जगात अक्षरशः त्सुनामी आणली. रिलीज होताच हा चित्रपट प्राइम व्हिडिओच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये 10 व्या क्रमांकावर पोहोचला.
दरम्यान, फक्त 13 दिवसांत या चित्रपटाने अनेक मोठ्या आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांना मागे टाकले आहे. प्रेक्षकांचा या चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, लवकरच तो टॉप 5 मध्येही सामील होऊ शकतो, अशी शक्यता आहे.
