Khalid ka Shivaji : मराठी सिनेमामुळे राजकारण तापलं, 'खालिद का शिवाजी' रिलीजविषयी मोठी अपडेट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Khalid ka Shivaji controvercy: मराठी चित्रपट 'खालिद का शिवाजी' सध्या महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतलाय.
मुंबई: मराठी चित्रपट 'खालिद का शिवाजी' सध्या महाराष्ट्रात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटावरून अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला असून, तो प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे. या वादामुळे चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे आणि राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू आहे. अशातच आता 'खालिद का शिवाजी' सिनेमाच्या रिलीजविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
'खालिद का शिवाजी' 8 ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज होणार होता. मात्र आता वादात सापडल्यामुळे सिनेमाची रिलीज थांबवण्यात आली आहे. या चित्रपटाच्या रिलीजवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने थेट ब्रेक लावला आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिन्यासाठी निलंबित करून चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
नेमका वाद काय आहे?
'खालिद का शिवाजी' या चित्रपटावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहासासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. ट्रेलरमधील दृश्यामुळे वातावरण तापलं आहे. त्यात शिवरायांच्या सैन्यात 35 टक्के मुसलमान सैनिक होते आणि रायगडावर मशीद बांधली होती, असा उल्लेख आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या दाव्यांवर कडाडून आक्षेप घेतला आणि राज्य सरकारकडे थेट मागणी केली “हा चित्रपट थांबवा!”
advertisement
राज्याच्या सांस्कृतिक विभागाने या प्रकरणात पाऊल उचलत, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचं नमूद केलं. सचिव किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय मंत्रालयाला पुनर्परीक्षणाची सूचना दिली.
सिनेमाची कथा काय आहे?
view comments‘खालिद का शिवाजी’मध्ये खालिद नावाच्या मुस्लिम तरुणाच्या बालपणापासून ते त्याच्या आयुष्यातील एका अनोख्या प्रवासापर्यंतची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याला असलेली ओढ, त्यांचा इतिहास शोधण्याची त्याची धडपड हीच या सिनेमाची मध्यवर्ती गोष्ट आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 08, 2025 1:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Khalid ka Shivaji : मराठी सिनेमामुळे राजकारण तापलं, 'खालिद का शिवाजी' रिलीजविषयी मोठी अपडेट


