सलमानने मिठी मारून केले सांत्वन
अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेला सलमान खान खूप शांत आणि गंभीर दिसत होता. त्याने दिवंगत अभिनेत्याच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी सलमानने पंकज धीर यांचा मुलगा आणि अभिनेता निकितिन धीर याला घट्ट मिठी मारून धीर दिला. वडिलांच्या जाण्याने निकितिन पूर्णपणे कोसळला होता, अशा भावनिक क्षणी वडिलांच्या मित्राचा मिळालेला आधार त्याला खूप मोलाचा ठरला.
advertisement
पंकज आणि सलमान यांचे जुने नाते
पंकज धीर आणि सलमान खान यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध जुने आहेत. पंकज धीर यांनी सलमान खानसोबत 'सनम बेवफा' आणि 'तुमको ना भूल पाएंगे' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. विशेष म्हणजे, निकितिन धीरनेही सलमान खानसोबत 'रेडी' आणि 'दबंग २' या गाजलेल्या चित्रपटांत स्क्रीन शेअर केली आहे.
पंकज धीर यांच्या अंतिम संस्कारासाठी 'महाभारत'मध्ये 'अर्जुन'ची भूमिका साकारणारे त्यांचे सहकलाकार फिरोज खान यांनीही हजेरी लावली होती.
६८ व्या वर्षी कॅन्सरने घेतले प्राण
मीडिया रिपोर्टनुसार, पंकज धीर यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी कॅन्सरशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर निधन झाले. 'महाभारत'मधील कर्णासोबतच त्यांनी शाहरुख खानच्या 'बादशाह', बॉबी देओलच्या 'सोल्जर', अक्षय कुमारच्या 'अंदाज' आणि अजय देवगणच्या 'टारझन: द वंडर कार' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता धीर, मुलगा निकितिन धीर, सून अभिनेत्री कृतिका सेंगर आणि ३ वर्षांची नात असा परिवार आहे.