नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या या लोकप्रिय शोच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला. राघव चढ्ढा यांच्या आईची तब्येत अचानक बिघडल्यामुळे, शूटिंग तात्काळ थांबवण्यात आली आणि त्यांना त्वरित रुग्णालयात हलवण्यात आलं. या घटनेमुळे संपूर्ण शूटिंगच रद्द करण्यात आलं. आता प्रोडक्शन टीमला शूटिंगसाठी नवीन तारीख निश्चित करावी लागणार आहे. तथापि, अद्याप चढ्ढा कुटुंबाकडून त्यांच्या तब्येतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नसल्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. सध्या चाहते त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी प्रार्थना करत आहेत.
advertisement
धक्कादायक घटनेनंतर परिणीतीची क्रिप्टिक पोस्ट
या घटनेनंतर, परिणीती चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर आयुष्याबद्दल एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे, ज्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न तिचे चाहते करत आहेत. परिणीतीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "कल्पना करा, तुम्ही एक पुस्तक वाचत आहात. त्यात मागचं पान पलटण्याचा पर्याय नाही. मग तुम्ही किती काळजीपूर्वक ते पुस्तक वाचाल? हेच तर जीवन आहे."
Don 3 मधून विक्रांत मेस्सी Out! 'बिग बॉस'चा विनर बनणार नवा व्हिलन? थेट रणवीर सिंगला भिडणार
या पोस्टने परिणीतीच्या मनात चाललेल्या विचारांची आणि तिच्या सासूबाईंच्या तब्येतीमुळे तिला झालेल्या वेदनेची कल्पना येते. यापूर्वी तिने एका प्रोजेक्टच्या सेटवरील फोटो शेअर केला होता. पापाराझी विरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर परिणीती, राघव आणि त्यांच्या आईचा एकत्र फोटो पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या शूटदरम्यान परिणीती चोप्राच्या सासूबाईंची तब्येत बिघडली, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि शूट रद्द करावं लागलं.
विरल भयानी यांच्या पोस्टवर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अनेक जण परिस्थिती ठीक होण्याची आणि परिणीतीच्या सासूबाई लवकरात लवकर बऱ्या होण्याची आशा व्यक्त करत आहेत. काही चाहत्यांनी तर, सध्या तरी परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांना शोमध्ये पाहता येणार नाही, याबद्दल नाराजीही व्यक्त केली.
