. सिनेमाच्या पोस्टवरमध्ये फुलाची पहिली झलक दिसतेय. तिच्या कपाळी भंडारा लावला आणि डोळ्यात पाणी आहे. ती नेमका कोणता विचार करतेय? तिच्यावर कोणतं संकंट आहे हे सिनेमा पाहिल्यानंतरच कळणार आहे.
advertisement
वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचा वेध घेत एका स्त्रीची कहाणी 'फुला' या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. अस्सल संगीताची मेजवानी मिळणार असून, बऱ्याच काळानंतर मराठी सिनेमात सात गाण्यांचा भरभक्कम अल्बम ऐकायला मिळणार आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील तरुण , काही तरी नवीन करू पाहणाऱ्या नवोदित तरुणांनी एकत्र येऊन हा सिनेमा तयार केला आहे.
'फुला' ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटात कान्हा तुझी बासरी, माझा राजा मल्हारी, आसरा तू माझ्या जीवाचा, कुंकू कोरलं कपाळी, मुरळी झाले मी गं बाई, कपाळी सजलं बाशिंग, डर्बीचा थरार ही सात गाणी या सिनेमात आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या या गाण्यातून वाघ्या-मुरळीच्या लोकसंस्कृतीचं चित्रण करत मुरळीच्या भावभावनाही मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अस्सल लोकसंस्कृती आणि आशयघन गाणी असलेला 'फुला' हा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहणं हा एक अनुभव ठरणार आहे.
पैलवान अजित शिवाजी जाधव यांनी "फुला" या सिनेमाची निर्मिती केली. सिनेमाची कथा अभिषेक जावीर यांची असून दिग्दर्शनही त्यांचेच आहे तर सिनेमाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे, आकाश नवगिरे यांनी सिनेमातील गाण्यांना आवाज दिला आहे. येत्या 17 एप्रिलला फुला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
