मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष पांडे यांच्या निधनाचं कारण समोर आलेलं नाही. पण आज मुंबईतच त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मागील 27वर्ष ते जाहिरात क्षेत्रात काम करत होते. पीयूष पांडे यांना 2016 साली भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मानिक केलं आहे. त्याचबरोबर त्यांना 2024 मध्ये LIA लीजेंड अवॉर्डही मिळालं आहे.
advertisement
पीयूष पांडे हे भारताच्या जाहिरात क्षेत्रातील मोठं नाव होतं. त्यांना जाहिरात क्षेत्रात मोठे बदल घडवूण आणले. ओगिल्वी इंडिया या त्यांच्या कंपनीमधून ते काम करत होते. तब्बल चार दशकाहून अधिक काळ त्यांनी आपल्या कंपनीच्या माध्यमातून नाव कमावलं. त्यांची ही कंपनी भारतातील जाहिरातींच्या जगातील एक प्रतीक बनली. त्यांच्या निधनाने जाहिरात विश्वातील एक युग संपलं असं म्हणावं लागेल.
पीयूष पांडे हे त्यांच्या खास लुकसाठीही ओळखले जायचे. त्यांची दाट मिशी आणि नेहमी हसतमुख चेहरा कायम लक्षात राहील. पीयूष पांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या प्रचाराचा 'अबकी बार, मोदी सरकार' ही फेमस टॅगलाइन त्यांनी लिहिली होती. त्यांच्या या कामामुळे चे प्रचंड चर्चेत आले होते.
पीयूष पांडे यांचा भारतीय समाजाची भाषा, संस्कृती आणि परंपरा याचा खोल अभ्यास होता. त्यामुळेच त्यांच्या जाहिराती किंवा कॅम्पेन या सामान्य माणसाच्या हृदयला भिडल्या. त्यांच्या प्रत्येक जाहिराती चर्चेत आल्या आणि लोकप्रिय झाल्या. वयाच्या 27 व्या वर्षी त्यांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल टाकलं होतं होतं. 'एशियन पेंट्स', 'कॅडबरी' सारख्या अनेक जाहिरातींमधून पीयूष पांडे हे नाव यशाच्या शिखरावर पोहोचलं. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन न निघणारी आहे.
