पूनम पांडेने सोशल मीडिया पेजवर लाइव्ह येत मृत्यूच्या बातमीबद्दल माफीही मागितली आहे. कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी असं केल्याचं तिने म्हटलं आहे. तिच्या मृत्यूच्या पोस्टने निर्माण झालेल्या प्रश्न, शंका कुशंकांना तिने उत्तर दिलं.
पूनम पांडेने म्हटलं की, गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झालेला नाही. दुर्दैवाने मी त्या शेकडो आणि हजारो महिलांबद्दल हे बोलू शकत नाही ज्यांनी गर्भाशयाच्या कर्करोगाने प्राण गमावला. त्यांना याबाबत माहिती नाही, याबाबत माहिती नाहीय की काय करायचं.
मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलेय की इतर कर्करोगांपेक्षा गर्भाशयाचा कर्करोग रोखता येऊ शकतो. तुम्हाला फक्त तुमचे चेकअप करावे लागेल आणि एचपीव्ही लस घ्यावी लागेल.
पुनम पांडेच्या इन्स्टाग्रामवर लिहिण्यात आलं होतं की, सकाळ आमच्यासाठी खूप कठीण होती. आम्हाला हे सांगताना दु:ख होत आहे की आमची लाडकी पूनमचं सर्वायकल कॅन्सरने निधन झालं आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांना तिच्याकडून खूप प्रेम मिळालं. या कठीण काळात तिच्या खासगीपणा जपावा अशी आम्ही विनंती करतो.