प्रसिद्ध ज्योतिषी आणि वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर यांनी प्राजक्ता गायकवाडच्या लग्नाला हजेरी लावली होती. त्यांनी प्राजक्ताचं कन्यादानही केलं. प्राजक्ताच्या नंदीवरून एन्ट्रीवर ट्रोल करणाऱ्यांना त्यांनी उत्तर देत त्यामागचं लॉजिक समजावून सांगितलं. पिंपळकर यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement
पिंपळकर म्हणाले, "दोन दिवसांआधी लाडकी अभिनेत्रीचं प्राजक्ता गायकवाडचा विवाह संपन्न झाला. विवाहापूर्वी एक देखावा सादर केला. ज्यात नवरा आणि नवरी मोठ्या नंदीवरून बसून मंडपात आले. पुढे शिवगणांचा धार्मिक देखावा साजरा करण्यात आला. शिव त्यांच्या गणांसमोर मिरवणूकीत सहभागी झाले होते. शिवगणांमध्ये जनावर, भूतं खेतं होती. हे पाहून बऱ्याच मंडळींना राग आहे. हे चुकीचं आहे, नवरा नवरी नंदीवर बसलेत आणि महादेव त्यांच्यासमोर नाचत आहे हे बरोबर. त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही कारण जो पर्यंत माहिती नसते तेव्हा आपलं मत असणं, चुकीचं वाटणं सहाजिक आहे. कारण प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण काही वेळा सोशल मीडियावर कोणतीही माहिती न घेता ट्रोलिंग केलं जातं. एकाने री ओढली की दुसरे त्यामागून बोलतात."
"हा देखावा सादर केला होता यामध्ये काहीही चुकीचं नव्हतं. याचं कारण धर्मशास्त्रानुसार, लग्नाचा मंडप असतो जिथे विवाह विधी होतात तिथे मंडप बंधन होतं. ज्या जोडप्याचं लग्न होतं ते नर आणि नारी न राहता साक्षात लक्ष्मी आणि विष्णू स्वरूपात त्यांचं अस्तित्व निर्माण होतं. किंवा त्यांना त्या स्वरूपात पाहायला पाहिजे असं धर्मशास्त्राने सांगितलं आहे."
नवरा- नवरी लक्ष्मी-नारायणाचं स्वरूप
पिंपळकर पुढे म्हणाले, "मी लहान होतो तेव्हा मी पाहिलंय, बरेच लोक नवरा नवरीच्या पाया पडतात. विवाह म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विष्णू लक्ष्मीचा संयोग आहे. आपल्या अपस्तंभ ग्रहांमध्ये असं विधान आहे पती विष्णू, पत्नी लक्ष्मी. म्हणजे पती हे विष्णूचं आणि पत्नी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. ज्यावेळी विवाह मंत्र म्हटले जातात, वधू वराला संबोधित करताना असं स्पष्ट म्हटलं जातं की, 'त्वम लक्ष्मीरसी, अयम विष्णूरसी.' नवरा नवरी नर नारी न राहता हे साक्षात विष्णू आणि लक्ष्मी आहेत."
लक्ष्मी-विष्णूंच्या लग्नाला भगवान शंकर यांची उपस्थिती होती
"ज्या वेळी विष्णी लक्ष्मीचा विवाह झाला त्यावेळेस शंकराने त्यांच्या गणांसहीत प्रत्यक्ष सहभाग घेतला याचा विविध पुरणांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पद्म पुराणाच्या पाताळ खंडामध्ये एक स्पष्ट श्लोक आहे. त्यामध्ये असं म्हणतात, 'तत्रा गच्छन सुराहासा,सर्वे ब्रम्हा लोकप्रितामा रुद्रोपि भगवान शरवहा, गणेश्वर समन्विता' याचाच अर्थ असा आहे सर्व देवता, ब्रम्हदेव, आणि शंकर आपल्या गणांसह तिथे उपस्थित होते. ते मध्यभागी उपस्थित होते आणि त्यांनी नृत्य देखील केलं. म्हणूनच आज विवाहात नंदी, शिवगण, शिवात्मक देखावा दाखवणं हे अज्ञान नाही. धर्माचा किंवा देवी देवतांचा अपमान नाही. तर तो क्षण पुन्हा सादर करायचा आणि प्राचीन पुराण परंपरेचं मूर्त स्वरूप आपल्या समोर आणायचा हा यामागचा हेतू आहे."
पिंपळकर यांनी पुढे सांगितलं, "विवाह होतो तेव्हा ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, त्यात असं म्हटलं जात की, शंकरोपी प्रमुदितो देवगुण समन्वितां, लक्ष्मी नारायणस्य दिव्य विवाह मुपागत.. शंकर अत्यंत आनंदाने देवगणांसहीत लक्ष्मी नारायणाच्या दिव्य विवाहाला आता आले आहेत. ते विवाह विधी जे देव स्थापन केले जातात त्यात सर्वात पहिले रुद्राचं म्हणजे शिवाचं स्थान मांडलं जातं, मानलं जातं आणि पूजलं जातं."
लग्नात नंदिचं महत्त्व
लग्नात नंदिचं महत्त्व सांगताना पिंपळकर म्हणाले, "नंदी म्हणजे फक्त बैल नाही. तो धर्मस्वरुप आहे. शास्त्रामध्ये स्पष्ट लिहिलं आहे. विवाह हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरूषार्धांपैकी पहिल्या धर्म या घटकाचा शुभारंभ असल्याने नंदी अत्यंत मंगल मानला जातो."
"विवाहात नंदी, शिव, शिवगण, शिवात्मक देखावा सादर करणं शास्त्रसिद्ध, पुराणसिद्ध आणि धर्म परंपरेला अनुसरून आहे. यावरून ट्रोल करणारे लोक ना पुराण ओळखतात ना संस्कृती. पद्मपुराण, स्कंद पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण सगळे एकच सांगतात की, शिव आणि त्याचे गण लक्ष्मी नारायणच्या विवाहाला उपस्थित होते. हेच प्रमाण लग्नात जो देखावा सादर केला त्यामागे आहे", असंही त्यांनी सांगितलं.
