प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम स्टोरीवर तिला आवडलेले अनेक व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत असते. तिने नुकताच एक व्हिडीओ स्टोरीला शेअर केला. खरा गोल्ड डिगर कोण?या विषयावर भाष्य करणारा हा व्हिडीओ आहे. Who Really is a Gold Digger?? असं कॅप्शन त्या व्हिडीओवर देण्यात आलं आहे. trulylovedose या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे जो प्राजक्ताने तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे.
advertisement
( Prajakta Mali Marriage : 36 वर्षांची प्राजक्ता माळी, अजून का करत नाहीये लग्न? )
या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलंय, खर्या gold diggers स्त्रिया नाहीत ते पुरुष आहेत, जे अपेक्षा करतात की स्त्री आपले संपूर्ण जीवन फक्त प्रेमासाठी देईल. यावर थोडा विचार करा, तिला जेवण बनवायचंय, घर साफ करायचंय कपडे धुणे, मुलांचं पालन पोषण करणं, वाढदिवस आयोजित करणं, अपॉइंटमेंट्स लक्षात ठेवणं. त्याचप्रमाणे त्याचे इमोशन्स सांभाळणं आणि संपूर्ण कुटुंबाचा मानसिक भार सांभाळायचा आहे. तरीही तिला रोज उठून जॉबला जावं लागतं, मेहनत करावी लागते आणि बिल्स 50-50 वाटायचे असतात. या सगळ्यात ती जास्त थकून जाते.
सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे, ती सर्व काही केल्यानंतर त्याला हे त्याग वाटत नाही. तो म्हणतो ती चांगली स्त्री नाही. नाही सर, ती चांगली स्त्री नाही. ती फक्त मोफत काम करणारी, घराची सहकारी, चाइल्डकेअर, थेरपिस्ट, स्वयंपाकी, नर्स, मॅनेजर एकटी सगळं हँडल करणारी आर्मी आहे.
इक्वल पार्टनशीर म्हणजे बॅलन्स, म्हणजे भार वाटून घेणे. सगळं तिच्या खांद्यावर टाकून स्वतःसाठी टाळ्या वाजवणे नाही. खरी गोष्ट म्हणजे बरेच पुरुष प्रत्यक्षात पार्टनर नकोच असतात त्यांना फक्त त्यांच्या आईशी डेट करायचं आहे. आई सर्व काही त्याग करते, पण ती स्त्री तुमची आई नाही. ती तुमची पार्टनर तुमची बरोबरीची साथीदार, तुमची टीम मेंबर आहे. जर तुम्ही तिला अशा प्रकारे वागवू शकत नसाल तर स्वतःला पुरुष म्हणवू नका. कारण प्रत्यक्षात तुम्ही गेल्ड डिगर आहात.
गोल्ड डिगर म्हणजे काय?
हा शब्द पुरुष किवा स्त्री दोघांसाठीही वापरला जाऊ शकतो. पैसा, संपत्ती, महागड्या भेटी किंवा आर्थिक फायद्यासाठी नात्यात येणारी व्यक्ती. अशा व्यक्तीचे मुख्य उद्दिष्ट प्रेम नसून समोरील व्यक्तीकडून आर्थिक लाभ मिळवणे असते.
