प्रसाद ओकने दिल्यात पाच हजार ऑडिशन्स!
प्रसाद ओक एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,"किती मालिका केल्यात, किती चित्रपट केले, किती व्यावसायिक नाटकं झाली याचा सगळ्याचा मी माझ्याकडे रेकॉर्ड ठेवला आहे. आजपर्यंत मला एकही व्यावसायिक जाहिरात मिळालेली नाही. ऐकताना खोटं वाटेल पण मी जवळजवळ पाच ते सहा हजार ऑडिशन्स दिल्यात जाहिरातीसाठी. पण मला एकही टीव्ही अॅड मिळालेली नाही".
advertisement
Bollywood Superstars Villains : हिरो राहिला बाजूला, व्हिलनच ठरला सुपरहिट! ब्लॉकबस्टर झाल्या या 8 फिल्म्स
प्रसाद ओक मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक, गायक, लेखक आणि कवी आहे. 'अवघाची संसार' या मालिकेच्या माध्यमातून प्रसाद ओकने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. धर्मवीर, फर्जंद, धुरळा, हिरकणी असे त्याचे अनेक चित्रपट गाजले आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या तो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
प्रसाद ओकच्या 'वडापाव'ची प्रतीक्षा
'वडापाव' हा प्रसाद ओकच्या अभिनय कारकिर्दीतील शंभरावा चित्रपट असल्यामुळे तो पहिल्यांदाच एकाच वेळी दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे त्यासाठी हा प्रवास अधिकच संस्मरणीय ठरणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, गौरी नलावडे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर आणि सविता प्रभुणे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तीन पिढ्यांची गोष्ट सांगणारा 'वडापाव' हा चित्रपट आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पाहावा, असा हा चित्रपट आहे. जीवनात आपुलकीसोबत थोडा तिखटपणा हवाच. नाहीतर नातं फिकं पडतं. हाच बॅलन्स दाखवणारा हा चित्रपट आहे.