अशी झालेली राहुलची अवस्था
प्रत्युषा बॅनर्जीने 1 एप्रिल 2016 रोजी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. आता फ्री फेस जर्नलसोबत बोलताना राहुल राज सिंह म्हणाला,"मी प्रत्युषाला मुंबईतील तिच्या घरी पंख्याला लटकलेलं पाहिलं तेव्हा ती जिवंत होती. त्यावेळी वेळेवर उपस्थित राहणारा मी पहिला व्यक्ती होतो. टाळा खोलणाऱ्या एका व्यक्तीच्या मदतीने मी दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. बेल वाजवूनही प्रत्युषा दरवाजा खोलायला येत नव्हती. त्यामुळे टाळावाल्याच्या मदतीने मला दरवाजा खोलावा लागला. त्यावेळी मी हिंमत केली आणि लगेचच तिला रुग्णालयात घेऊन गेलो. रुग्णालयात घेऊन जात असतानाही ती जिवंत होती. मी CPR देण्याचाही प्रयत्न केला. पण तिचा जीव वाचला नाही".
advertisement
राहुल राज सिंहने आपली एक्स गर्लफ्रेंड प्रत्युषा बॅनर्जीसोबचा शेवटचा संवादही शेअर केला. राहुल म्हणाला,"आम्ही पहिल्यांदा भेटलो त्यावेळचे प्रत्युषाचे विचार काहीसे वेगळे होते. आम्ही 10 महिने एकमेकांना डेट केलं. प्रत्युषाचे वडिल एक वाईट व्यक्ती होते. ते अभिनेत्रीला शिव्याही द्यायचे. प्रत्युषाला शिव्या देणं आणि ऐकणं आवडत नसे. जेव्हा एक वडिल मुलीला शिव्या देतात तेव्हा त्या गोष्टीचा त्या मुलीवर काय परिणाम होत असेल. आज मलाही एक मुलगी आहे आणि मी विचार करतो मी जर तिला शिव्या दिल्या तर तिला किती वाईट वाटेल. प्रत्युषा त्यावेळी मला सांगायची की मी पैसे कमावते. पण माझे वडील दारू पिण्यात, व्यसन करण्यात पैसे खर्च करतात. याबाबतचा आमचा शेवटचा संवाद झाला होता".
प्रत्युषाच्या निधनाने बॉयफ्रेंडवर लागलेले हे आरोप
राहुल पुढे म्हणाला,"प्रत्युषाच्या आत्महत्येला मी जबाबदार असल्याचं त्यावेळी म्हटलं गेलं. इन्वेस्टिगेशनमुळे मला तिच्या अंत्यसंस्कारालाही जाता आलं नाही. प्रत्युषाला मीच मारलं असल्याचं आरोप माझ्यावर लावला गेला. मला 'हत्यारा' म्हटलं गेलं. मी माझ्या गर्लफ्रेंडला मारायला मुंबईत आलो होतो का?".
