TRENDING:

डोळ्यात सुडाची आग, खुनशी वृत्ती; अभिनेत्री प्रिया बेर्डेचं TVवर कमबॅक, धडकी भरवणारा लुक समोर

Last Updated:

Priya Berde Comeback in Serial : डोळ्यात सुडाची आग आणि खुनशी वृत्ती असलेला प्रिया यांचा लुक अंगावर शहारे आणतोय. प्रिया बेर्डे नव्या मालिकेत एन्ट्री घेत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपल्या दमदार अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना आपण अनेक कलाकृतींच्या माध्यमातून भेटत आलोय. प्रिया बेर्डे यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना एक नवी अनुभूती मिळालीय. प्रिया बेर्डे लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. मालिकेतील तिला पहिला लुक समोर आला आहे. डोळ्यात सुडाची आग आणि खुनशी वृत्ती असलेला प्रिया यांचा लुक अंगावर शहारे आणतोय.
News18
News18
advertisement

स्टार प्रवाहच्या काजळमाया मालिकेतून प्रिया बेर्डे कमबॅक करत आहेत. त्यांचा आतापर्यंतचा कधीच न पाहिलेला अंदाज या मालिकेत पाहायला मिळणार आहे.  कनकदत्ताच्या रुपात त्या पुन्हा एकदा मालिका विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहेत.

( Onkar Bhojane : 'हा इथे काय करतोय?' जिवलग मित्राचं हास्यजत्रेत कमबॅक! भोजने परत येताच वनिता खरातची पोस्ट )

advertisement

काय आहे प्रिया यांची भूमिका?

चेटकीण वंशामधील विलक्षण सुंदर असलेल्या आणि तंत्रविद्येत प्रविण असलेल्या पर्णिका नावाच्या चेटकीणीची गोष्ट काजळमाया मालिकेत पाहायला मिळणार आहे.  रुपाने सुंदर असलेली पर्णिका कमालीची स्वार्थी, निर्दयी आणि संधीसाधू आहे. चेटकीण वंश वाढवण्याचं एकमेव ध्येय तिच्या डोळ्यांसमोर आहे आणि त्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. कनकदत्ता ही पर्णिकाची आई. सुडाच्या भावनेने पेटलेली, अत्यंत खुनशी आणि मोठे डोळे आणि आपल्या चेटकीण मुलीबद्दल अभिमान बाळगणारी. कनकदत्ताची आपल्या मुलीने म्हणजेच पर्णिकाने चेटकीण वंश पुढे वाढवावा एवढीच इच्छा आहे. याच हेतूने ती पर्णिकाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला खत पाणी घालते. कनकदत्ता आणि पर्णिका आपलं ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरणार का याची उत्कंठावर्धक गोष्ट काजळमाया मालिकेतून पाहायला मिळेल.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीसाठी स्टायलिश कुर्तीज, किंमत 300 रुपये,मुंबईतील या मार्केटमध्ये करा खरेदी
सर्व पहा

कनकदत्ता या भूमिकेविषयी सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या, "माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात अश्या पद्धतीची भूमिका मी कधीही साकारलेली नाही. कनक दत्ताला पहाता क्षणीच धडकी भरते. ती बेमालूमपणे वेषांतर करते. तिला संमोहन विद्या अवगत आहे. अनेक कंगोरे आहेत या भूमिकेला. प्रेक्षकांना नक्की आवडेल याची खात्री आहे."

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
डोळ्यात सुडाची आग, खुनशी वृत्ती; अभिनेत्री प्रिया बेर्डेचं TVवर कमबॅक, धडकी भरवणारा लुक समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल