TRENDING:

‘पुष्पा 2’ चा नवा रेकॉर्ड, रिलीजच्या आधीच केली हजारो कोटींची कमाई

Last Updated:

रिलीजच्या आधीच अल्लू अर्जुन करतोय 'रूल’. पुष्पा 2 चं बजेट 500 कोटींचं, रिलीजच्या आधीच कमवले 1000 कोटी

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :- दाक्षीणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2: द रूल’ डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होतोय. ‘पुष्पा 1’ प्रमाणे हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणार हे स्पष्ट दिसतंय. चित्रपटाने रिलीज व्हायच्या आधीच विक्रमी 1,085 कोटी रुपयांची कमाई नवा विक्रम प्रस्थापित केलाय.
पुष्पराजच्या भूमिकेत अल्लू अर्जुन
पुष्पराजच्या भूमिकेत अल्लू अर्जुन
advertisement

एका वृत्तानुसार, अनेक राज्यांमध्ये विकल्या गेलेल्यात चित्रपटाच्या वितरण हक्कातून 640 कोटींची कमाई केलीये.. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 220 कोटी रुपये, उत्तरेकडील राज्यातून 200 कोटी रुपये, तामिळनाडू 50 कोटी रुपये, कर्नाटक 30 कोटी आणि केरळमधून 20 कोटी रुपयांची कमाई झालीये. चित्रपटाच्या परदेशातील वितरण हक्कांनी 140 कोटी रुपयांची कमाई केली. नेटफ्लिक्सने डिजिटल स्ट्रीमिंगचे हक्क 275 कोटी रुपयांना, तर म्युझिकचे हक्क 65 कोटी रुपयांना आणि सॅटेलाईटचे हक्क 85 कोटी रुपयांना विकले गेलेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वाहन ब्लॅकलिस्ट टाळायचंय? काय होतात त्याचे परिणाम? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

सुकुमार दिग्दर्शित आणि मैत्री मूव्ही मेकर्स निर्मित, 'पुष्पाः द राइज' या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'पुष्पाः द राइज' या चित्रपटात रश्मिका मंदाना, फहाद फासिल आणि श्रीतेज, अनसूया भारद्वाज, प्रियामणी आणि जगदीश प्रताप बंडारी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या श्रध्दा कपूर विशेष भूमिकेत दिसणार आहे.  ‘पुष्पा 2’ हा ‘पुष्पा 1’चा रिमेक असून आधीच्या चित्रपटात दाखवल्या प्रमाणे याही चित्रपटाची कथा लाल चंदनाच्या तस्करीच्या वर असणार आहे. मात्र ‘पुष्पा 2’ मधून तस्करीच्या जगाचं सखोल वर्णन असून पुष्पराजला नवीन आणि अधिक धोकादायक विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. ‘पुष्पा 1’ च्या यशानंतर हा बीग बजेट सिनेमा असून या सिनेमाचं बजेट 500 कोटी रुपयांचं आहे. त्यामुळे रिलीजच्या आधीच चित्रपटाने बजेटच्या दुप्पट कमाई केलीये. त्यामुळे रिलीजनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमाकूळ घालणार यात काही शंका नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
‘पुष्पा 2’ चा नवा रेकॉर्ड, रिलीजच्या आधीच केली हजारो कोटींची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल