देशाचे प्रतिनिधित्व करणारा कार्यक्रम रद्द
शिल्पा शेट्टीच्या वतीने तिचे वकील निरंजन मुंडर्गी यांनी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर अर्ज मागे घेत असल्याची माहिती दिली. वकिलांनी कोर्टाला सांगितले की, शिल्पा शेट्टी लॉस एंजेलिसमध्ये YouTube च्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होती आणि ती त्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव भारतीय अभिनेत्री होती. मात्र, गेल्या काही सुनावणींदरम्यान प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यामुळे तिचा परदेश प्रवासाचा बेत पूर्ण होऊ शकला नाही.
advertisement
वकिलांनी स्पष्ट केले की, भविष्यकाळात शिल्पा आणि राज कुंद्रा यांना जेव्हाही परदेशात जायचे असेल, तेव्हा ते नव्याने अर्ज दाखल करतील. सध्या ते हा अर्ज मागे घेत आहेत.
फसवणुकीचा गंभीर आरोप
शिल्पा आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध व्यावसायिक दीपक कोठारी यांनी ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. २०१५ ते २०२३ या काळात व्यवसायाच्या विस्ताराच्या नावाखाली दिलेले पैसे शिल्पा आणि राज यांनी वैयक्तिक खर्चासाठी वापरले, असा त्यांचा आरोप आहे.
मागील सुनावणीत कोर्टाला सांगण्यात आले होते की, शिल्पाला ऑक्टोबरमध्ये लॉस एंजेलिसमध्ये YouTube च्या इव्हेंटसाठी, त्यानंतर कोलंबोमध्ये एका इव्हेंटसाठी आणि मालदीवमध्ये व्यावसायिक ट्रिपसाठी जायचे होते. परंतु, आता हा सर्व बेत फिस्कटला आहे.