'गोष्ट तिच्या घटस्फोटाची'चा नाटकाचा 17 मे रोजी शिवाजी मंदिर येथे पहिला प्रयोग पार पडला. या प्रयोगाला प्रेक्षकांची गर्दी केली होती. नाटकाचा प्रयोग सुरू असताना नाट्यगृहात एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज सतत घुमत होता. त्यामुळे केवळ कलाकारच नाही तर समोर बसलेले प्रेक्षकही वारंवार विचलित होत होते. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्या नाटकाचे अभिनेते राजन ताम्हाणे यांनी नाटकाचा प्रयोग मध्येच थांबवला.
advertisement
( लोकांसाठी नॅशशल क्रश, पण खऱ्या आयुष्यात कशी असते गिरीजा ओक? पाहा VIDEO )
अभिनेते राजन ताम्हाणे यांनी नाटकाचा प्रयोग थांबवला आणि स्टेजवर पुढे येत विनंती केली. "आई वडिलांनी कोणी तरी शांतपणे तिला बाहेर घेऊन जा..." असं सांगितलं. केवळ एका क्षणासाठी नाटक थांबवल्यानंतर राजन ताम्हाणे यांनी पुन्हा बेअरिंग पकडत नाटक सुरू केलं. त्यांचा हा संयम, व्यावसायिकता आणि प्रसंगावधानाचं सगळेच कौतुक करत आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
राजन ताम्हणे यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका युझरने लिहिलंय, "त्यांनी जे केलं ते बरोबर होतं. स्टेजवर परफॉर्मन्स करणाऱ्या कलाकारांना माहिती असतं काय होतं." दुसऱ्यानं लिहिलंय, "किती शांतपणे सांगितलं. आणखी एकाने लिहिलंय, तो डायलॉग त्या मुलीच्या आई वडिलांना मारला पाहिजे होता."
एका युझरने लिहिलंय, "यात काही चुकीचं नाही. बरोबर आहे डिस्टर्ब होतं." आणखी एकाने लिहिलंय, "किती तरी प्रेक्षक मोबाईल चालू ठेवतात. अगदी विनंती केली तरी. कलाकाराची एकाग्रता भंग होते".
याआधी देखील अनेक मराठी कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगादरम्यान मोबाईल वाजणे आणि लहान मुलांच्या रडण्याचे आवाज आल्यानंतर नाटक थांबवून शांत राहण्याची विनंती केली आहे. अभिनेता सुबोध भावे आणि सुमीत राघवन, भरत जाधव यांनीही अनेकदा याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
