TRENDING:

Kissing Controversy नंतर पहिल्यांदाच राखी सावंत-मीका सिंग एकत्र, रोमँटिक डान्स VIDEO VIRAL

Last Updated:

Mika Singh Rakhi Sawant controversy : काही वर्षांपूर्वी, मीका सिंगने आपल्याला बळजबरीने किस केल्याचा गंभीर आरोप राखी सावंतने केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच मीका-राखी पुन्हा एकत्र आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आणि प्रसिद्ध पंजाबी गायक मीका सिंग हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी वादासाठी नव्हे, तर मैत्रीसाठी! अनेक वर्षांपूर्वी, मीका सिंगने आपल्याला बळजबरीने किस केल्याचा गंभीर आरोप राखी सावंतने केला होता, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि त्यांचा तो व्हिडीओही तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर राखीने थेट कायदेशीर कारवाई केली होती.
News18
News18
advertisement

किसिंग कॉन्ट्रोव्हर्सीनंतर पहिल्यांदाच राखी-मीका एकत्र

जवळपास दोन दशके चाललेला हा जुना वाद आता या दोघांनी पूर्णपणे विसरल्याचे दिसत आहे. नुकतंच एका रेस्टॉरंटमध्ये राखी सावंत आणि मीका सिंग एकत्र दिसले. एवढेच नाही, तर या दोघांनी तिथे एकत्र डान्स देखील केला. त्यांचा हा रोमँटिक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामुळे नेटिझन्सना मोठा धक्का बसला आहे. या वादानंतर दोघे पुन्हा इतके सहजपणे एकत्र आलेले पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

advertisement

'प्रेतांवर उभी राहिलेली ती जागा', महेश मांजरेकर आजही 'त्या' ठिकाणी जात नाहीत, अजूनही उडतो थरकाप

व्हायरल डान्स व्हिडीओवर मीका सिंगने दिलं स्पष्टीकरण

मीका सिंगने स्वतः जुन्या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. गायक म्हणाला, "जुने वाद आता आम्ही विसरलो आहोत. आता आम्ही खूप चांगले मित्र आहोत आणि एकमेकांसोबत बोलतो देखील." हा डान्स संपल्यावर मीकाने प्रेमाने राखीला मिठी मारली, ज्यामुळे त्यांच्यातील संबंध पूर्णपणे सुरळीत झाले आहेत, हे स्पष्ट झाले.

advertisement

नेमका काय होता तो '२००६' चा किस्सा?

राखी आणि मीकामधील हा वाद २००६ साली सुरू झाला होता. मीका सिंगच्या वाढदिवसाच्या पार्टीत राखी सावंतही उपस्थित होती. त्याच पार्टीत मीका सिंगने राखी सावंतला बळजबरीने किस केले. यानंतर राखी सावंतने याविरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. हा हाय-प्रोफाईल वाद अनेक वर्षे मीडियामध्ये गाजला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हिवाळ्यात गाईचे तूप आरोग्यासाठी फायदेशीर, त्वचा राहील तजेलदार,आणखी हे फायदे पाहा
सर्व पहा

दरम्यान, मीका सिंग पंजाबीसह बॉलिवूड संगीत विश्वात कार्यरत आहे, तर राखी सावंतला अभिनयात मोठे यश मिळाले नसले तरी तिने तिच्या अतरंगी आणि बेधडक स्टाईलने इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Kissing Controversy नंतर पहिल्यांदाच राखी सावंत-मीका सिंग एकत्र, रोमँटिक डान्स VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल