TRENDING:

3.16 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, आधीपेक्षाही भयंकर अवतारात परतली शिवानी रॉय

Last Updated:

Mardaani 3 Trailer : राणी मुखर्जीच्या मर्दानी 3 सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मुलींच्या तस्करीविरोधात जबरदस्त संघर्ष करताना राणी दिसतेय. सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राणी मुखर्जीच्या आगामी चित्रपट 'मर्दानी 3' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. राणी मुखर्जी शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत परतली आहे. यावेळी शिवानीचा सामना एका पुरूषाशी नाही तर मुलींची तस्करी करणाऱ्या महिलेशी होतो. 3 मिनिटे 16 सेकंदांचा हा ट्रेलर खूपच जबरदस्त आहे. ट्रेलरमधून चित्रपटाच्या कथानकाची स्पष्ट कल्पना येते. यावेळी शिवानीचा सामना अम्माशी होतो. जी निष्पाप मुलींचे अपहरण करून त्यांची तस्करी करणारी महिला आहे.
News18
News18
advertisement

चित्रपटाचा ट्रेलर खूपच भयानक आहे. मर्दानी 3 ची कथा हृदयद्रावक आहे. स्वत: एक महिला असून महिलांशी कशी शत्रू असते हे यातून उलगडण्यात येणार आहे. स्वतः एक महिला असूनही अम्मा ही सिनेमाची खलनायिका आहे.  मुलींचे अपहरण करते आणि त्यांना पैशांसाठी विकते.  शिवाय, मुली तिच्या कामाच्या नसतानाही ती त्यांना कचऱ्यासारखे सोडून देते आणि दुर्लक्षित करते.

advertisement

( Vijay Thalapathy : विजयच्या प्रायवेट जेटचं तासाचं भाडं किती? संपूर्ण दिवसाच्या किंमतीत विकत येईल नवीन लक्झरी कार )

3 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येते की शिवानी आणि अम्माचा सामना सोपा नाहीये. दोघांमध्ये एक भयंकर युद्ध होणार आहे. अम्मा जितकी धूर्त आणि निर्दयी आहे तितकीच पोलीस अधिकारी शिवानीही तितकीच धूर्त आणि प्रामाणिक आहे. ती कोणत्याही किंमतीवर तिच्या कर्तव्याशी तडजोड करणार नाही. अम्मा शिवानीला विकत घेण्याचा प्रयत्न करते आणि उघडपणे लाच देते.

advertisement

ट्रेलरमध्ये असे अनेक जबरदस्त डायलॉग आहेत. शिवानी अम्माला सांगते की, तिच्या लोकांनी तिचे तुकडे केले तरी ती त्यांना घाबरणार नाही. ती अम्माला धमकी देते की यावेळी शिवानी शिवाजी रावशी भांडणं दुर्दैवी आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
संक्रांतीच्या आधी भोगी का साजरी करतात? भोगीच्या भाजीची परंपरा काय? Video
सर्व पहा

ट्रेलर समोर आल्यानंतर चित्रपट रिलीज कधी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे.  मर्दानी 3 या चित्रपटांच्या निमित्तानं राणी मुखर्जी बॉलिवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण होत आहेत.  हा चित्रपट 30 जानेवारी रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
3.16 सेकंदाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, आधीपेक्षाही भयंकर अवतारात परतली शिवानी रॉय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल