राणी मुखर्जीने रिजेक्ट केलेला संजय दत्तचा चित्रपट
संजय दत्त आणि ग्रेस सिंह यांच्या या चित्रपटाचं नाव 'मुन्नाभाई एमबीबीएस' असं आहे. 19 डिसेंबर 2003 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. अरशद वारसी, बोमन ईरानी आणि कुरुष देबू अशी तगडी स्टारकारस्ट असणाऱ्या चित्रपटात संजय दत्त ग्रेसी सिंहसोबत स्क्रीन शेअर करताना दिसले होते. पण ग्रेसी सिंह या चित्रपटासाठी पहिली पसंती नव्हती. ग्रेसी सिंहआधी राणी मुखर्जी यांना या चित्रपटासाठी निवडले होते. पण त्यांनी हा चित्रपट करण्याचं नाकारलं. ग्रेसी सिंहने 'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्ये डॉक्टरच्या भूमिकेला न्याय दिला होता.
advertisement
'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा बॉलिवूड गाजवणाऱ्या राजकुमार हिराणी यांनी सांभाळली होती. तर विधु विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. 22 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाचं बजेट त्यावेळी 10 कोटी रुपये होतं. पण जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 35 कोटी रुपये कमावले आणि भारतात 23 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.
राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 3'ची प्रतीक्षा
राणी मुखर्जी या हिंदी मनोरंजनसृष्टीतील एक अभ्यासू अभिनेत्री असून त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. राणी मुखर्जी यांचा 'मर्दानी 3' हा आगामी चित्रपट 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटात अभिनेत्रीचं एक वेगळं रुप पाहायला मिळेल.