TRENDING:

Dhurandhar Controversy: ‘धुरंधर’मुळे ‘राष्ट्रीय अपमान’ झाला; आदित्य धर, रणवीर सिंगसह सर्वांच्या विरोधात कोर्टात याचिका

Last Updated:

Dhurandhar Controversy: रणवीर सिंगचा धुरंधर चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रचंड वादात अडकला असून, या चित्रपटाविरोधात थेट कराची न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ट्रेलरमधील कथित आक्षेपार्ह मजकुरामुळे दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकारांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली/कराची: रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेला धुरंधर हा चित्रपट भारतात बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर राजकीय कारणांमुळेही चर्चेत आला आहे. हा राजकीय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट पाकिस्तानमध्ये इतका वादग्रस्त ठरला आहे की, या चित्रपटप्रकरणी कराचीतील स्थानिक न्यायालयापर्यंत प्रकरण पोहोचले आहे.

advertisement

धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर, निर्माते आणि चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या टीम सदस्यांविरोधात कराचीतील जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका कराचीच्या जिल्हा व सत्र न्यायालय (दक्षिण) येथे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 22-A आणि 22-B अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.

advertisement

मोहम्मद आमिर नावाच्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली असून, तो स्वतःला पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चा कर्मचारी असल्याचा दावा करतो. याचिकेत धुरंधर चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि इतर क्रू मेंबर्स यांना प्रस्तावित आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. तर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

advertisement

अर्जदाराचा आरोप आहे की, धुरंधर चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीला दहशतवाद्यांशी सहानुभूती दाखवणारी संघटना म्हणून दाखवण्यात आले आहे. तसेच कराचीतील लियारी भागाला “दहशतवादी युद्धक्षेत्र” (terrorist war zone) म्हणून संबोधण्यात आले असून, PPP चा पक्षध्वज आणि पक्षाच्या माजी अध्यक्षा यांची छायाचित्रे बेकायदेशीरपणे वापरण्यात आली आहेत.

advertisement

मोहम्मद आमिरचा दावा आहे की, 10 डिसेंबर रोजी कराचीतील दारख्शान पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका कॅफेमध्ये असताना त्याला सोशल मीडियावर धुरंधर चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर आणि प्रमोशनल व्हिडिओ पाहिला. त्यानंतरच आमिरला या कथित आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्या.

अर्जामध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, चित्रपटामध्ये पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची छायाचित्रे, PPP चा पक्षध्वज आणि पक्षाच्या रॅलीतील दृश्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता वापरण्यात आली आहेत. यामुळे PPP ला दहशतवाद्यांशी सहानुभूती दाखवणारा पक्ष म्हणून दाखवण्याचा खोटा, बनावट आणि द्वेष पसरवणारा प्रयत्न करण्यात आला आहे, असा आरोप अर्जदाराने केला आहे.

अर्जदाराचा असा दावा आहे की, हा सगळा प्रकार PPP, त्याचे नेतृत्व आणि समर्थकांविरोधात द्वेष आणि वैरभावना भडकवण्यासाठी करण्यात आला आहे. तसेच कराची शहराला, विशेषतः लियारी परिसराला “दहशतवादी युद्धक्षेत्र” म्हणून दाखवणे हे भडकावणारे, दिशाभूल करणारे आणि पाकिस्तान तसेच तेथील नागरिकांच्या प्रतिमेला धक्का देणारे आहे, असेही अर्जात म्हटले आहे.

या अर्जात असेही नमूद करण्यात आले आहे की, चित्रपटातील कथित प्रक्षोभक आणि बदनामीकारक मजकुराच्या निर्मिती, निर्मिती प्रक्रिया आणि वितरणासाठी संबंधित सर्व आरोपी जबाबदार आहेत. त्यांच्या कृत्यांमुळे गुन्हेगारी धमक्या, दंगल घडवण्याच्या उद्देशाने चिथावणी, विविध गटांमध्ये द्वेष पसरवणे यांसारखे गंभीर गुन्हे घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मोहम्मद आमिर यांनी असा दावा केला आहे की, या प्रकरणामुळे त्यांना मानसिक त्रास, भावनिक अस्वस्थता आणि प्रतिष्ठेचे नुकसान सहन करावे लागले. यामुळे त्यांनी दारख्शान पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यासाठी औपचारिक तक्रार दिली होती, मात्र पोलिसांनी ती नोंदवण्यास नकार दिला, असेही अर्जात नमूद आहे.

अर्जदाराने न्यायालयाकडे दारख्शान पोलीस ठाण्याच्या एसएचओला एफआयआर दाखल करण्याचे आदेश देण्याची आणि दक्षिण कराचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP South) यांनी या प्रकरणाच्या तपासावर देखरेख करावी, अशी मागणी केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरले, सोयाबीन आणि मक्याला किती मिळाला भाव? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar Controversy: ‘धुरंधर’मुळे ‘राष्ट्रीय अपमान’ झाला; आदित्य धर, रणवीर सिंगसह सर्वांच्या विरोधात कोर्टात याचिका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल