TRENDING:

Rashmika Mandanna: 'आता सोडणार नाही', रश्मिकाची 'ती' क्लिप व्हायरल, लग्नाच्या 15 दिवसातच अभिनेत्रीसोबत काय घडलं?

Last Updated:

Rashmika Mandanna Viral Audio Clip: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाच्या चर्चांदरम्यान रश्मिकाच्या मोडलेल्या साखरपुड्या संदर्भातील एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून रश्मिकाने याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीची नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सध्या तिच्या व्यावसायिक यशापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत आहे. अभिनेता विजय देवरकोंडासोबतच्या तिच्या लग्नाच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जणू काही आगच लावली होती. मात्र त्यांच्या लग्नाच्या चर्चा थांबत नाहीत, तोच रश्मिकाच्या आयुष्यातील एक जुनं प्रकरण पुन्हा एकदा उकरून काढण्यात आलं आहे. रश्मिका आणि तिचा आधीचा जोडीदार रक्षित शेट्टी यांच्या संबंधांशी निगडित एक ऑडिओ क्लिप सध्या इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरत आहे. यावर मौन सोडत रश्मिकाने आता थेट लीगल ॲक्शन घेण्याचा इशारा दिला आहे.
News18
News18
advertisement

काय आहे त्या व्हायरल ऑडिओ क्लिपचं गूढ?

गेल्या २४ तासांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रश्मिकाची आई सुमन मंदाना या रश्मिका आणि रक्षित शेट्टीच्या साखरपुड्याच्या काळातील त्रासाबद्दल बोलत असल्याचा दावा केला जात आहे. रश्मिकाच्या मते, हा संवाद जवळपास ८ वर्षांपूर्वीचा असून तो पूर्णपणे खाजगी होता. कोणाच्याही परवानगीशिवाय तो रेकॉर्ड करून आता चुकीच्या संदर्भाने पसरवला जात आहे.

advertisement

८ वर्ष शांत राहिले, पण आता...

रश्मिकाने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. ती म्हणाली, "गेल्या ८ वर्षांपासून मी सतत चुकीची माहिती, ट्रोलिंग आणि वैयक्तिक हल्ले सहन करत आहे. अनेकदा माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला गेला, तर कधी मी न बोललेल्या गोष्टी माझ्या नावावर खपवल्या गेल्या. केवळ व्ह्यूज आणि एंगेजमेंटसाठी लोकांनी माझं आयुष्य सर्कस बनवलं. मी आजवर शांत राहिले, कारण मला वाटलं की सार्वजनिक जीवनाचा हा एक भाग आहे. पण आता माझ्या कुटुंबाला आणि माझ्या जवळच्या व्यक्तींना यात ओढलं जातंय, ही मर्यादा ओलांडणारी गोष्ट आहे."

advertisement

२४ तासांत दाखल करणार कायदेशीर नोटीस

रश्मिकाने मीडिया प्लॅटफॉर्म्स, इन्फ्लुएन्सर्स आणि ती क्लिप शेअर करणाऱ्यांना कडक शब्दांत ताकीद दिली आहे. तिने स्पष्टपणे सांगितलं आहे की, ही क्लिप खाजगी आयुष्यावर केलेलं आक्रमण असून हे मानहानी करणारी आहे. ही क्लिप शेअर करणाऱ्यांनी ती पुढच्या २४ तासांत काढून टाकावी. जर उद्यापर्यंत ही क्लिप हटवली नाही, तर रश्मिका संबंधितांवर कायदेशीर नोटीस बजावून कठोर कारवाई करणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इराण-इस्रायल युद्धामुळं गॅस टंचाई, पुण्यात लग्नसराईच्या केटरर्सकडून ऑर्डर रद्द, पालक चिंतेत, Video
सर्व पहा

रश्मिकाने आपल्या चाहत्यांचे आभार मानत शेवटी एक भावनिक संदेश दिला. ती म्हणाली, "काही अनोळखी लोक आपण कसं जगावं हे ठरवू शकत नाहीत. आपण आपलं आयुष्य स्वतः निवडतो. तुमच्या प्रेमामुळेच मी इथवर पोहोचले आहे आणि यापुढेही माझं सत्य जपत मी पुढे जाईन."

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika Mandanna: 'आता सोडणार नाही', रश्मिकाची 'ती' क्लिप व्हायरल, लग्नाच्या 15 दिवसातच अभिनेत्रीसोबत काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल