TRENDING:

इराण-इस्रायल युद्धामुळं गॅस टंचाई, पुण्यात लग्नसराईच्या केटरर्सकडून ऑर्डर रद्द, पालक चिंतेत, Video

Last Updated:

गॅस टंचाईचा फटका आता थेट लग्नसमारंभांनाही बसू लागला आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे काही केटरिंग व्यावसायिकांना लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : इराण-इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, गेल्या काही दिवसांपासून गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. या गॅस टंचाईचा फटका आता थेट लग्नसमारंभांनाही बसू लागला आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे काही केटरिंग व्यावसायिकांना लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात लग्न आहे त्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर आम्ही काही पालकांशी संवाद साधून त्यांना नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
advertisement

घेतलेल्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ

पिंपरी-चिंचवड शहरात साधारणपणे लग्नाचा मुहूर्त असलेल्या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नसोहळे पार पडतात. एका दिवशी अंदाजे 400 ते 500 लग्नसोहळे होतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये जवळपास 30 मुहूर्त असल्याने या काळात सुमारे 10 ते 12 हजार लग्नसोहळे पार पडण्याची शक्यता आहे.या लग्नसमारंभांच्या जेवणाची जबाबदारी शहरातील नोंदणीकृत सुमारे 450 केटरर्स तसेच अनेक छोटे केटरिंग व्यावसायिक घेतात. मात्र लग्नसराई सुरू होण्याच्या आधीच गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे काही केटरिंग व्यावसायिकांना घेतलेल्या ऑर्डर रद्द करण्याची वेळ येत असल्याचे समोर येत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तोट्यात जाणाऱ्या शेतीला आधुनिक पद्धतीनं पिकवलं, 60 लाखांचा झाला नफा, अनुराग यांनी कसा केला प्रयोग?
सर्व पहा

दरम्यान, पिंपरी-चिंचवड येथील संदीप कोंडे यांच्या पुतणीचे लग्न 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. मात्र केटरिंग व्यावसायिकांकडून फोन करून लग्नामध्ये जेवणाची व्यवस्था करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. गॅस उपलब्ध नसल्यामुळे जेवणाची व्यवस्था करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.याबाबत संदीप कोंडे यांच्यासह इतर काही पालकांनी या समस्येवर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
इराण-इस्रायल युद्धामुळं गॅस टंचाई, पुण्यात लग्नसराईच्या केटरर्सकडून ऑर्डर रद्द, पालक चिंतेत, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल