सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साखरपुडा ३ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून १५ मिनिटांनी विजयच्या हैदराबादमधील निवासस्थानी झाला. अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडलेल्या या सोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबांतील सदस्य हजर होते. दोघांनी एकत्र 'गीता गोविंदम्' आणि 'डिअर कॉम्रेड' यांसारख्या यशस्वी चित्रपटांत काम केले आहे. आता साखरपुड्याची चर्चा खरी मानली, तर त्यांचे लग्न फेब्रुवारी २०२६ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
रश्मिकाने चाहत्यांना दिली खुशखबर
साखरपुड्याच्या या जोरदार चर्चा सुरू असताना, चाहते रश्मिका आणि विजयकडून एका फोटोची किंवा अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, रश्मिकाने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून सगळ्यांना आणखी बुचकळ्यात पाडले.
रश्मिका-विजयने गुपचूप उरकला साखरपुडा? कशी सुरू झाली या जोडीची लव्ह स्टोरी? 'इथे' झाली पहिली भेट
चाहत्यांना वाटले की, ती साखरपुड्याचे क्षण नक्कीच शेअर करेल, पण तिने तसे न करता तिच्या आगामी 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. "मला माहीत आहे की, तुम्ही सगळे याची वाट पाहत होता आणि ती गोष्ट आता तुमच्यासाठी आहे," असे तिने या पोस्टमध्ये लिहिले. हा चित्रपट ७ नोव्हेंबरला तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचेही तिने जाहीर केले.
रश्मिकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला. "विजयसोबत साखरपुडा झाला की नाही, हे खरे आहे की फक्त अफवा?" असे प्रश्न विचारले जात आहेत. अभिनेत्रीने मात्र आपल्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या टप्प्याबद्दल मौन बाळगले आहे.
या सगळ्या गदारोळात रश्मिका आणि विजय आपापल्या कामात व्यस्त आहेत. रश्मिका लवकरच 'थामा' या आगामी हॉरर कॉमेडी फिल्ममध्ये आयुष्मान खुरानासोबत दिसणार आहे, जो २०२५ च्या दिवाळीत प्रदर्शित होईल. तर, विजय 'राजधानी' नावाच्या एका गुप्तहेर कथांवर आधारित चित्रपटात दिसला होता.