रेखा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका जुन्या कार्यक्रमातील आहे. कार्यक्रमात उपस्थित चाहत्यांनी रेखाला पाहताच टाळ्यांचा कडकडाट केला. रेखा स्टेजवर आल्या आणि वातावरण पूर्णपणे बदलून गेलं.
( 15,000 लोकांच्या गर्दीत रेखाचा कंट्रोल सुटला, अमिताभसोबत केलं असं काही; आजही होतेय चर्चा )
रेखा यांनी माइक हातात घेतला. त्या म्हणाल्या, "मित्रांनो मी असं ऐकलं आहे की देवाच्या इच्छेशिवाय झाडाचं एक पानही हलत नाही. त्याचप्रमाणे मी असं म्हणते की, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय माझी कंबर हलत नाही. चलिये कुछ कमर हिलाना हो जाये..." असं म्हणत रेखा स्टेजवर नाचायला सुरुवात करते. परदेसीया या गाण्याच्या म्युझिकवर रेखा नाचतात.
advertisement
रेखा पुढे म्हणतात, "तुम्हाला तर माहिती आहे की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. तुम्हाला माहितीये मी तुम्हाला किती आवडते. पण एक गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये ती म्हणजे तुम्हा सगळ्यांनी मी जितके आवडते, तुमच्या माझ्यावर जितकं प्रेम आहे त्यापेक्षा हजारो, करोडोंहून जास्त मला तुम्ही आवडता. त्यामुळे माझी देवाकडे हिच प्रार्थना आहे की तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहावं आणि मी तुमच्यासमोर असंच येत राहून तुम्ही सगळ्यांचं असंच मनोरंजन करत राहीन"
अभिनेत्री रेखा यांचा व्हायरल होणारा हा व्हिडीओ Lehrentv या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रेखा यांनी पंजाबी लूक केला आहे. रेखाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रेखा यांना एव्हरग्रीन अभिनेत्री का म्हणतात याचं उत्तम उदाहरण देणारा हा एक व्हिडीओ आहे.
