प्रत्येक माणसाचं जन्माच्या आधीपासूनही जे नातं जुळतं ते आपल्या आईशी! जन्मानंतर रूढार्थानं त्याची आईशी नाळ कापली जाते पण तरी ती नाळ आयुष्यभर जोडलीच राहते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबर प्रत्यक्ष साथ करत राहते…. तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं! अशीच आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणाऱ्या उत्तर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
advertisement
( नीलम कोठारे नाही, गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर! बायको सुनिता म्हणाली, 'मी जेव्हा रंगेहात...' )
'उत्तर' असं सिनेमाचं नाव असून अत्यंत संवेदनशील विषयावर हा सिनेमा आहे. अभिनेता अभिनय बेर्डे या सिनेमात मुलाच्या भुमिकेत आहे. तर अभिनेत्री रेणूका शहाणेनं आईची भुमिका साकारली आहे. सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शकीय पदार्पण आहे. तर ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घराची, नि घरातल्या प्रत्येक मुलांची, तरीही आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी गोष्ट आहे. 12 डिसेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
रेणूका शहाणे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी 1994 साली आलेल्या हम आपके हैं कौन या सिनेमात एकत्र काम केलं होतं. पूजा भाभी आणि लालू भैया यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. जवळपास 30 वर्षांनी रेणूक शहाणे आता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनयसोबत दिसणार आहे.
तंत्रज्ञानाच्या या युगात संवादाची साधने जरी वाढली असली तरी माणसांचा आपआपसांतील संवाद कमी होत चालल्याची चिंता आपण अनेकदा व्यक्त करतो. फास्ट फुड, फास्ट वाय फाय, सगळं काही इन्स्टंट, रेडिमेड हवं, असा विचार करणाऱ्या आजच्या पिढीला थोडा ठहराव देणाऱ्या आईची ही गोष्ट असावी , असा अंदाज टिझरवरून येत आहे.
'डबलसीट', 'फास्टर फेणे', 'धुरळा' सारख्या सुपरहिट चित्रपटांचं लेखन करणाऱ्या शिवाय हिंदीमध्येही 'सिंघम २' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं आणि 'ताली'सारख्या संवदेनशील वेबसिरीजचं लेखन करणाऱ्या क्षितिज पटवर्धनने या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली असून या चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शनात पदार्पण करतोय हे विशेष. उत्तर बद्दल बोलताना तो म्हणाला की, "आई हे सगळ्यात गृहीत धरलेलं, त्यामुळेच जवळचं असूनही दुर्लक्ष होणारं नातं आहे. तिचा फक्त 'व्यक्ती' म्हणून विचार करणारी आणि 'आई आणि मूल' या नात्याचा नव्याने विचार करायला लावणारी कलाकृती करायची, यातून 'उत्तर' हा सिनेमा जन्माला आला."
