जान्हवीच्या उद्धट वागण्याला घरातील सगळेच सदस्य कंटाळले होते. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनीही जान्हवीला घराबाहेर काढण्याची मागणी केली होती. रितेश देखील जान्हवीवर प्रचंड भडकला. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील जान्हवीला तिची जागा दाखवली. ,"माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुला स्थान नाही", असं म्हणत रितेशनं जान्हवीला घराबाहेर काढलं.
रितेशनं भाऊच्या धक्क्याची सुरुवातच जान्हवीची शाळा घेत सुरू केली. सुरुवातीला पंढरीनाथ कांबळे यांना ओव्हर एक्टिंग केलेल्या प्रकरणावर रितेशनं जान्हवीला झापलं. जान्हवीला सुनावत रितेश म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील सगळ्यात वर्स्ट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याची लिमिट असते.
advertisement
रितेश पुढे म्हणाला, "डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात...तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे".
"महाराष्ट्रातील प्रेक्षक जान्हवीवर प्रचंड भडकले आहेत. सोशल मीडियावर जान्हवीवर चांगलाच राग काढला जात आहे. बाहेर जान्हवी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. प्रेक्षकांच्या मनात असलेल्या सगळ्याच गोष्टी रितेशनं जान्हवील सुनावल्या", असं रितेश म्हणाला.
रितेश जान्हवीला म्हणाला,"तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय. कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय".
"करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते..लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो", म्हणत रितेशनं चांगलाच राग काढला.
रितेशनं जान्हवीला घराबाहेर काढलं आणि जेलमध्ये बंद केलं. संपूर्ण भाऊचा धक्का जान्हवी घरात आली नाही. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत जान्हवी जेलमध्ये राहणार आहे. इतकंच नाही तर भाऊच्या धक्क्यावर रितेशनं जान्हवीचं नाव घेणंही टाळलं. निक्कीशी बोलताना "तुमची बाहेर बसलेली मैत्रीण" असा उल्लेख रितेश करताना दिसला.
रितेशनं या आठवड्याचा भाऊचा धक्का चांगलाच गाजवला. अशाच भाऊचा धक्का दर आठवड्याला पहायला आवडेल अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या आहेत. रितेशचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.
