advertisement

Bigg Boss Marathi 5: 'सगळ्यात खोटारडी व्यक्ती आहेस' रितेश भाऊ जान्हवीला दाखवणार बाहेरचा रस्ता?

Last Updated:

'बिग बॉस मराठी 5' सीझन होऊन सत्ताविस दिवस उलटले. घरात स्पर्धकांचा जोरदार ड्रामा सुरु आहे. कोण उगाच काहीतरी बडबडतं, तर कोणी विनाकारण भांडण वाढवतं, कधी वाद, कधी मैत्री बिग बॉसच्या घरात सतत पहायला मिळते.

रितेश भाऊ जान्हवीला दाखवणार बाहेरचा रस्ता!
रितेश भाऊ जान्हवीला दाखवणार बाहेरचा रस्ता!
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' सीझन होऊन सत्ताविस दिवस उलटले. घरात स्पर्धकांचा जोरदार ड्रामा सुरु आहे. कोण उगाच काहीतरी बडबडतं, तर कोणी विनाकारण भांडण वाढवतं, कधी वाद, कधी मैत्री बिग बॉसच्या घरात सतत पहायला मिळते. आत्तापर्यंत स्पर्धकांच्या वागण्यावरुन प्रेक्षकांनी काहींचं कौतुक केलंय तर काहींना जोरदार ट्रोल. आज होणाऱ्या भाऊच्या धक्क्यात रितेश भाऊ जान्हवीला तिची जागा दाखवणार आहे. याचा प्रोमो आऊट झाला असून जान्हवीला आज बाहेरचा रस्ता दाखवणार असल्याचं दिसतंय.
'बिग बॉस मराठी'च्या या आठवड्यात जान्हवी पॅडी दादांना म्हणाली होती,"आयुष्यभर अॅक्टिंग केली आता इथे येऊन ओव्हरअॅक्टिंग करताय". त्यावर जान्हवीला सुनावत रितेश भाऊ म्हणाला,"जान्हवी तुम्ही 'बिग बॉस मराठी'च्या इतिहासातील एक वाईट सदस्य आहात. कोणत्या गोष्टीत किती पर्सनल जावं याची लिमिट असते. डिक्शनरीमध्ये ओव्हर हा शब्द फक्त तुमच्यासाठी आहे. या भाऊच्या धक्क्यावर आता मी बंदोबस्त करणार आहे. हा शो फक्त तीन महिन्यांपूरता आहे. लोक इथे करिअर घडवायला येतात. तुम्ही काय संपवायला आला आहात...तुमचा ओव्हर कॉन्फिडिन्स तुम्हाला नडणार आहे".
advertisement
रितेश भाऊ पुढे म्हणाला,"तुम्ही नाटकी आहात तुम्ही ढोंगी आहात. लोकांना सगळं दिसतंय. तुम्ही मेलोड्रामा करता. सगळे कॅमेरे स्वत:कडे वळवण्याचा प्रयत्न करता. पॅडींची मागितलेली माफी मनापासून होती का? एवढं असूनही पॅडी भाऊंनी मोठ्या मनाने तुम्हाला माफ केलं. जान्हवी तुम्ही मोठ्या कलाकारांसह छोट्या कलाकारांचाही अपमान करताय."
advertisement
advertisement
'कलाकार छोटा असो किंवा मोठा असो तो कलाकारच असतो. खोटं वागण्याला एक लिमिट असते. आम्हाला असं वाटतं जान्हवी जे करते ते सगळं नाटक आहे. या घरातली सगळ्यात खोटारडी व्यक्ती जान्हवी आहे. हे सगळं फुटेज आणि क्रेडिटसाठी तुम्ही करताय. करिअर घडवायला किती मेहनत घ्यावी लागते..लोकांचं प्रेम मिळवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तुमचा उर्मटपणा इथे बंद होणार आहे. आजनंतर माझ्या भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला स्थान नाही. तुम्हाला शिक्षा झालीच पाहिजे. मी तुम्हाला तुमची जागा दाखवतो', असंही रितेश देशमुखने म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5: 'सगळ्यात खोटारडी व्यक्ती आहेस' रितेश भाऊ जान्हवीला दाखवणार बाहेरचा रस्ता?
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement