Bigg Boss Marathi 5: कोण करणार घात? पॅडी आणि DP च्या चर्चेनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Last Updated:

‘बिग बॉस मराठी 5’ यंदाच्या सीझन खूप चर्चेत आहे. स्पर्धक घरात चांगलाच कल्ला करत आहे. वाद, भांडण, मैत्री, सतत पहायला मिळत आहे. घरातील कोणत्या सदस्यामध्ये कधी कोणता कल्ला होईल हे सांगता येत नाही.

कोण करणार घात?
कोण करणार घात?
मुंबई : ‘बिग बॉस मराठी 5’ यंदाच्या सीझन खूप चर्चेत आहे. स्पर्धक घरात चांगलाच कल्ला करत आहे. वाद, भांडण, मैत्री, सतत पहायला मिळत आहे. घरातील कोणत्या सदस्यामध्ये कधी कोणता कल्ला होईल हे सांगता येत नाही. दोन टीम बनल्या असून सदस्य सतत काहीना काही गोंधळ घालताना दिसत आहे. आजच्या भागात कोण करणार टीमचा घात? यावर पॅडी आणि DP चर्चा करताना दिसणार आहे. याचा प्रोमोही समोर आलाय.
किचनमध्ये अंकिता, अभिजित आणि निक्कीचं भांडण सुरु असतं. त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणावरुन पॅडी आणि डिपीची चर्चा सुरु आहे. दोघंही चर्चा करत अभिजित टीमचा घात करणार असं म्हणत आहेत. प्रोमोमध्ये दोघांची चर्चा आज पहायला मिळेल.
advertisement
सत्ताविसाव्या दिवशी घरात आणखी काय राडे होणार? हे पाहणं आज महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक सदस्य स्वतःला वाचवत इतरांना चुकीचं ठरवायचा प्रयत्न करतो. यंदाचे सदस्य एकापेक्षा एक वरचढ असून सतत घरात कल्ला करताना दिसतात.
advertisement
दरम्यान, 'बिग बॉस मराठी 5' चा आज सत्ताविसावा दिवस आहे. यंदाचा सीझन खूपच चर्चेत असून सोशल मीडियावर सतत याविषयी गॉसिप्स व्हायरल होतायेत. रोज बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये नवीन राडे, मस्ती, वाद, सुरुच आहे. त्यांच्या कल्ल्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होत आहे. काही स्पर्धकांना प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे तर काही स्पर्धक चांगलेच ट्रोल होत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5: कोण करणार घात? पॅडी आणि DP च्या चर्चेनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement