Bigg Boss marathi 5: 'मला जाऊ द्याना...' बिग बॉसच्या घरात अंघोळीवरुन कल्लोळ, छोटा पुढारी आणि अरबाजमध्ये काय चाललंय?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
'बिग बॉस मराठी 5' चा आज सत्ताविसावा दिवस आहे. यंदाचा सीझन खूपच चर्चेत असून सोशल मीडियावर सतत याविषयी गॉसिप्स व्हायरल होतायेत. रोज बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये नवीन राडे, मस्ती, वाद, सुरुच आहे. त्यांच्या कल्ल्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होत आहे.
मुंबई : 'बिग बॉस मराठी 5' चा आज सत्ताविसावा दिवस आहे. यंदाचा सीझन खूपच चर्चेत असून सोशल मीडियावर सतत याविषयी गॉसिप्स व्हायरल होतायेत. रोज बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये नवीन राडे, मस्ती, वाद, सुरुच आहे. त्यांच्या कल्ल्याने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होत आहे. काही स्पर्धकांना प्रेक्षकांच्या मनात जागा बनवली आहे तर काही स्पर्धक चांगलेच ट्रोल होत आहे. आजच्या भागात छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करताना दिसणार आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नवा प्रोमो खूपच गंमतीशीर आहे. या प्रोमोमध्ये छोटा पुढारी अरबाजला एक छोटीशी रिक्वेस्ट करत म्हणतोय,"अंघोळीला लवकर जा म्हणतोय तरी जात नाहीस". छोटा पुढारीला उत्तर देत अरबाज म्हणतो,"नाही जाणार मी अंघोळीला... माझी अंघोळ झाल्यानंतरच तू जायचं अंघोळीला". त्यावर घन:श्याम म्हणतोय,"स्वत:ही जात नाहीस आणि मलादेखील जाऊ देत नाही".
advertisement
दरम्यान छोटा पुढारी म्हणतो,"माझा भाऊ करु देतना आम्हाला अंघोळ". पुढे अरबाज त्याला प्रश्न विचारतो,"आता कसं वाटतंय". अरबाज आणि घन:श्याम अनेकदा एकमेकांसोबत धमाल करताना दिसून येतात. त्यांची ही धमाल प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरते. आजच्या भागातही प्रेक्षकांना त्यांचा हा गंमतीशीर अंदाज पाहायला मिळणार आहे.
advertisement
पुढे अरबाज आणि छोटा पुढारीच्यामध्ये पडत सूरज म्हणतो,"तुमच्या नादात खूप वेळ वाया जातोय". त्यानंतर अरबाज अंघोळीला जातो. त्यांचा हा मजेशीर संवाद आज रात्री पहायला मिळेल. आजच्या भागात आणखी काय खास होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2024 3:43 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss marathi 5: 'मला जाऊ द्याना...' बिग बॉसच्या घरात अंघोळीवरुन कल्लोळ, छोटा पुढारी आणि अरबाजमध्ये काय चाललंय?