‘राजा शिवाजी’मध्ये एक सीन करू दे!
रितेश देशमुखने त्याच्या शालेय जीवनातील मित्र आणि सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांच्या निधनानंतर ही पोस्ट लिहिली आहे. रितेशने सांगितलं की, ६ वर्षांपूर्वी जेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणार असल्याचं जाहीर केलं, तेव्हा सिद्धार्थ यांनी त्याला फोन केला होता. ते म्हणाले होते, “रितेश, मला फक्त ‘राजा शिवाजी’मध्ये एक छोटासा सीन करू दे.” त्यांचं महाराजांवर असलेलं प्रेम पाहून रितेश थक्क झाला होता.
advertisement
“मी एडिटिंग करत होतो आणि…”
रितेशने सांगितलं की, काही महिन्यांपूर्वीच त्याने आणि सिद्धार्थ यांनी संजय दत्तसोबत एका चित्रपटासाठी एकत्र शूट केलं होतं. सेटवर त्यांची उपस्थिती खूप सकारात्मक होती. रितेशने त्याच्या पोस्टमध्ये एक खूपच भावनिक गोष्ट लिहिली आहे. तो म्हणाला, “आज मी त्याच सीनचं एडिटिंग करत होतो आणि सिद्धार्थचा अभिनय पाहून मी थक्क झालो होतो. मला त्याला फोन करून ही गोष्ट सांगायची होती. पण, तितक्यात मला धक्कादायक बातमी मिळाली की, सिद्धार्थ आता या जगात नाही!”
रितेश म्हणाला, “माझ्या मनात विचार येतोय की, आम्ही दोघे एकत्र बसून हा चित्रपट पाहू आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊ. पण, नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं.” रितेशने सिद्धार्थ यांना ‘भाऊ’ म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांना दुर्मीळ हिरा म्हटलं आहे.