रितेश देशमुखने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने त्याच्याच लई भारी चित्रपटातील माऊली गाण्यातील ओळी लिहिल्या आहेत.
रितेशची पोस्ट
रितेशने लिहिलं, "भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची... उभी पंढरी आज नादावली... तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी, जिवाला तुझी आस गा लागली... जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली... आषाढी एकादशीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!".
advertisement
रितेश देशमुख आषाढी पोस्ट
दरम्यान, यंदा जवळपास 20 लाख वारकरी पंढरपूरात दाखल झाले असून, अनेक दिंड्या 15-20 दिवसांचा पायी प्रवास करून येथे पोहोचल्या आहेत. या एकादशीच्या दिवशी भाविक उपवास ठेवून विष्णू वा विठोबाची पूजा करतात. तुलशी पत्र, गंध, फुले अर्पण करून अभंग गातात. याच वेळी भाविक भगवद्गीता किंवा विष्णुसहस्रनामाचे पठणही करतात. भव्य याञा, ढोल-ताशा, टाळ-मृदंगाच्या गजरात, 'माऊली-माऊली'च्या घोषात आषाढी एकादशीचा उत्सव पहायला मिळतो.