Dipika Chikhlia On Ramayana: 'ती माझ्यासारखी सीता नसेल...' 'रामायण' सिनेमातील साई पल्लवीच्या भूमिकेवर काय म्हणाल्या दीपिका चिखलिया?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Dipika Chikhlia On Ramayana: नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी या सिनेमाच्या स्टारकास्टविषयी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट केवळ भव्यदिव्य निर्मितीमुळेच नाही, तर रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश, सनी देओल, रवी दुबे यांसारख्या दिग्गज कलाकारांमुळेही चर्चेत आहे. हा सिनेमा चर्चेत असतानाच 1987 'रामायण' मालिकेतील सीता अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी या सिनेमाच्या स्टारकास्टविषयी प्रतिक्रिया दिली.
नव्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्यावर दीपिकाने अमर उजालाशी बोलताना तिचं प्रांजळ मत व्यक्त केलं. ती म्हणाली की टीझरमध्ये दृश्यं खूपच भव्य आणि आधुनिक वाटली, पण ती खरी 'रामायण' भावना हरवली आहे की काय, अशी चिंता तिला वाटते.
advertisement
ती म्हणाली, "व्हिज्युअल्स छान आहेत, पण 'रामायण' ही भावनांची गोष्ट आहे. तंत्रज्ञानाने आपण कथा दाखवू शकतो, पण त्यातील भक्ती आणि नात्यांची खोली दाखवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा आम्ही काम केलं तेव्हा तंत्रज्ञान नव्हतं, पण लोक आमच्याशी अंतर्मनाने जोडले गेले."
रणबीर कपूरच्या रामाच्या भूमिकेबाबत दीपिका म्हणाली, "रणबीर undoubtedly चांगला अभिनेता आहे, पण मला पाहताना सतत अरुण गोविल यांची आठवण झाली. तोच आमचा राम आहे. 35-40 वर्षांपासून आमच्या मनात एकच प्रतिमा आहे." सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीची निवडही दीपिकाला मान्य आहे. ती म्हणाली, "ती खूप नैसर्गिक अभिनेत्री आहे. तिचे मल्याळम चित्रपट मी पाहिले आहेत. मला खात्री आहे की ती चांगलं काम करेल, ती माझ्यासारखी सीता नसेल माझ्यापेक्षा वेगळी सीता असेल."
advertisement
पण ज्या गोष्टीने दीपिकाचं मन हलकं दुखावलं, ती म्हणजे या नव्या 'रामायण' प्रोजेक्टमध्ये तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही. ती म्हणाली, "मी फक्त सीता आहे. रामायणात मी इतर कोणतीच भूमिका करू शकत नाही. महाभारतासारखा काही प्रोजेक्ट असता तर विचार केला असता." या चित्रपटात अरुण गोविल दशरथच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्याबाबत दीपिका म्हणाली, "जेव्हा मी त्यांना त्या रूपात पाहिलं, तेव्हा हृदयातून आवाज आला 'हे तर रामजी आहेत!' त्यांच्या चेहऱ्यावर आजही तीच शांतता आहे. त्यांना दशरथ म्हणून पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं."
advertisement
दरम्यान, नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग 'रामायण: द इंट्रोडक्शन' या नावाने दिवाळी 2026 मध्ये प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा चित्रपट IMAX फॉरमॅटमध्येही प्रदर्शित होणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 06, 2025 3:38 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dipika Chikhlia On Ramayana: 'ती माझ्यासारखी सीता नसेल...' 'रामायण' सिनेमातील साई पल्लवीच्या भूमिकेवर काय म्हणाल्या दीपिका चिखलिया?